Headlines

Atul Pethe : गावागावांत एसी बार, पण नाट्यगृहांना मुलभूत सुविधाही उपलब्ध होत नाहीत; रंगकर्मी अतुल पेठे यांचं वक्तव्य


Atul Pethe : रंगकर्मी अतुल पेठे यांनी नाट्यगृहांच्या दयनीय परिस्थितीबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

Atul Pethe On Poor Condition Of Theatres
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल मराठी नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. अनेक नाटकं हाऊसफुल होतायत. अशातच काही नाट्यगृहांची परिस्थिती मात्र अतिशय दयनीय असते. तांत्रिक बिघाड, अस्वच्छ शौचालय, मेकअप रूमची अस्वच्छता अशा अनेक अडचणींचा कलाकारांना सामना करावा लागतो. अशातच आता रंगकर्मी अतुल पेठे यांनी नाट्यगृहांच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अतुल पेठे ?

गेल्या काही वर्षात नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकवर्गातही खूप मोठा बदल झाला आहे, याबद्दल बोलताना अतुल पेठे म्हणाले की, ‘नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची एकाग्रता अजिबात कमी झालेली नाहीये. मी ‘आषाढातील एक दिवस’ हे तीन अंकी नाटक केलं. चंद्रकांत कुलकर्णींनी ‘चारचौघी’ हे तीन अंकी नाटक केलं. लोकांनी तीन-तीन तास बसून याचे प्रयोग पाहिलेत. जर तुमचा कंटेट चांगला असेल तर लोक तुमचे प्रयोग नक्कीच पाहतात. आपले प्रामाणिक प्रयत्न असतील तर प्रेक्षकांपर्यंत ते निश्चितच पोहोचतात.’

Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा

अतुल पेठे पुढे म्हणाले की, ‘प्रेक्षक अतिशय सुजाण असतात. चांगल्या नाटकांची अशी अनेक उदाहरणं आहेत. पण, प्रत्येक प्रायोगिक नाटक प्रेक्षक डोक्यावर घेतील असंही नाहीये. कारण, त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. लोकांचं ट्रेनिंग नीट झालंय का, ज्या गावात आपण नाटक सादर करतोय तिथे सुविधा आहेत का? सुखसोयी आहेत का? आता अनेक गावात दिवेही नसतात, बसायला खुर्च्या नाहीत तर हे लोक नाटक कसे पाहतील? यात समाजाची आणि सरकारची सुद्धा जबाबदारी आहे.’
Maharashtra TimesMahesh Tilekar : भक्तीच्या नावाखाली बाजार, स्वामींच्या अवतारात येऊन बारसं करतात, उगाच हातवारे करतात; महेश टिळेकर यांचं परखड मत
‘एक साधं उदाहरण सांगतो, आता गावागावांत एसी बार आहेत. तिथे म्युझिक सुरू असतं, सुंदर इंटिरिअर आहे, बसायला गुबगुबीत गाद्या आहेत. लोकांचा विचार करून या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. मग, हाच विचार नाट्यगृहांच्या बाबतीत का केला जात नाही. कारण, ती आपली गरजच नाही. सामाजिक गरज जेव्हा निर्माण होईल, तेव्हा गोष्टी आपोआप घडून येतात.’ असं अतुल पेठे यांनी ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा