Headlines

Ashok Kharat Wife Kalpana Kharat Bought Land Worth 57 Lakhs in Raigad Uran while his was Absconding; कल्पना खरातचा नवीन पराक्रम, फरार असतानाही जमिनीचा व्यवहार; रायगडमध्ये लाखोंची जमीन खरेदी


Kalpana Kharat Land Purchase in Uran : कल्पना खरातने उरणमध्ये जमीनखरेदी केली आहे. विशेष म्हणजे अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीसही मिळाली. कल्पना खरात फरार असतानाही ओळख प्रक्रिया कशी झाली? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Kalpana Kharat Land Purchase in Uran
कल्पना खरात उरण जमीनखरेदी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : भोंदूगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अशोक खरात याचे आता उरणशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. खरात तुरुंगात आणि त्याची पत्नी फरारी असताना, पत्नीच्या नावावर उरणमध्ये ५८ लाख ५० हजार रुपयांचा जमीन व्यवहार पार पडला आहे. या प्रक्रियेत महसूल आणि नोंदणी विभागाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे आता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत.

व्यवहाराची वर्दी नोटीस चावडीवर

उरण तालुक्यातील चाणजे गावातील सर्व्हे क्रमांक ३७१/३ (क्षेत्र ०.२०.०० आर) ही जमीन अस्मिता अविनाश म्हात्रे आणि कैलास मिश्रीमल शहा यांच्याकडून कल्पना अशोक खरात हिच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. १२ मार्च २०२६ रोजी हे खरेदीखत नोंदवले गेले. धक्कादायक बाब म्हणजे, १७ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी अशोक खरातला बेड्या ठोकल्या, त्याच दिवशी तलाठी सजा चाणजे यांनी या व्यवहाराची वर्दी नोटीस चावडीवर प्रसिद्ध केली.
Maharashtra TimesMarathi Compulsion : रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी येणं गरजेचं, अन्यथा परवाने रद्द? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…

‘हायप्रोफाइल’ गुन्हेगाराच्या प्रकरणात महसूल यंत्रणेची तत्परता

सामान्य माणसाला सातबाऱ्यावर नाव चढवण्यासाठी वर्षानुवर्षे तहसील कचेरीचे उंबरठे झिजवावे लागतात. जमीन व्यवहारांमध्ये तलाठी, सर्कलची जागरूकता अतितीव्र असते. नियमांवर बोट ठेवून त्रुटी काढल्या जातात व वरकमाईचे निमित्त शोधले जाते. मात्र, या ‘हायप्रोफाइल’ गुन्हेगाराच्या प्रकरणात महसूल यंत्रणेने चक्रे अत्यंत वेगाने फिरवली. १३ एप्रिल २०२६ रोजी, म्हणजेच महिना पूर्ण होण्याआधीच फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर करण्यात आला. आरोपीची पत्नी फरारी असताना तिची ओळख कशी पटवण्यात आली आणि इतक्या वेगात फेरफार कसा मंजूर झाला, असा प्रश्न आहे.
Maharashtra TimesCrime News : मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायचेत, नांदेडच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मित्राकडे अनैसर्गिक संबंधांचा तगादा, 24 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

व्यवहार करण्यासाठी कोणाचा वरदहस्त होता?

या संदर्भात संशय वाढल्यानंतर नायब तहसीलदार पेडवी यांनी स्पष्टीकरण दिले. ‘संबंधित फेरफार नोंद कार्यालयात आली होती; मात्र पुढील कार्यवाहीसाठी कोणीही न आल्याने ती रद्द करण्यात आली आहे.’ मूळ खरेदीखत अद्याप अस्तित्वात असल्याने भविष्यात ही नोंद पुन्हा जिवंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा व्यवहार नेमका कोणत्या स्थितीत आहे, याबाबत संभ्रम आहे. या प्रकरणातील दुय्यम निबंधक कार्यालय, तहसीलदार आणि तलाठी यांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. फरारी महिलेची ओळख पडताळणी कोणी केली, अटकेच्या दिवशीच नोटीस कशी प्रसिद्ध झाली, हा व्यवहार करण्यासाठी कोणाचा वरदहस्त होता, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा