Headlines

Ashadhi Ekadashi Yatra: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी यात्रेसाठी धावणार 5500 एसटी बसेस, परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा


Pratap Sarnaik On Ashadhi Wari 2026: आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक, पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

wari
आषाढी वारी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात साडेपाच हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

Maharashtra TimesPune News : लग्नाच्या दहा वर्षांनी पाळणा हलला, पण मोशी दुर्घटनेत 25 दिवसांच्या बाळाचं पितृछत्र हरपलं; लेकराने कष्टाळू वडील गमावले
सरनाईक म्हणाले, ‘गेल्या वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने पाच हजार १४५ विशेष बस चालवून २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्याहून अधिक सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. वारकरी भाविकांसाठी पंढरपूर व परिसरात चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

Maharashtra TimesPune Crime : लोहगडावरुन केतनला कसं ढकलायचं, लुल्लानगरच्या टेकडीवर केलेली प्रॅक्टिस; पकडलं गेल्यास काय? सिया-चेतनचं प्लॅनिंग समोर
ग्रुप बुकिंगची सुविधा
राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बससेवेतही सरकारच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत तिकीटदरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा