APK File Scam: एपीके फाइलद्वारे आर्थिक लुबाडणुकीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली.

पोलिस उपायुक्त आर. रागसुधा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने बनावट एपीके फाइल पाठवून ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका व्यक्तीने दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
धर्म पाहून कारवाई केली का? मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना प्रश्न; तडीपारीचा आदेश रद्द
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक युवराज पाटील, सहायक निरीक्षक धनवेश पाटील, अभिजित देशमुख आणि उपनिरीक्षक किरण देवरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. मोबाइल क्रमांक, एपीके फाइल आणि बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांचा तपास झारखंडपर्यंत पोहोचला. त्यानंतर झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पाठलाग करून मंडल याला अटक करण्यात आली.
तीन हजार नागरिकांना गंडा
मंडल याची कसून चौकशी केल्यानंतर ९१ एपीके फाइलच्या माध्यमातून देशभरातील २,९९३ नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील ५१२ नागरिकांचा समावेश आहे. मंडल याच्याकडून पोलिसांनी १० मोबाइल फोन, एक लॅपटॉप, सात सिम कार्ड आणि चार डेबिट कार्ड जप्त केली आहेत.
Indian Railway: कन्फर्म तिकिटांसाठी बनावट VIP मार्ग; लोकभवनाच्या खोट्या शिक्क्यांचा वापर, सूत्रधारासह 3 रेल्वे एजंट अटकेत
३७ हजार नागरिकांचा डेटा हाती
पोलिसांनी मंडल याच्याकडून जप्त केलेल्या सामग्रीत सुमारे ३७,२०० नागरिकांच्या बँक खात्यांचा डेटा सापडला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बँक खात्यांचा तपशील मंडल याच्याकडे कसा आला, याचा तपास पोलिस करत आहेत. हा डेटा इतर सायबरचोरांकडेही पोहोचला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आरोपीकडे काय सापडले ?
मोबाइल फोन : १०
लॅपटॉप : १
सिम कार्ड : ७
डेबिट कार्ड : ४
बँक खात्यांचा डेटा : सुमारे ३७,२०० नागरिकांचा

