Headlines

Annu Kapoor : सीतेच्या भूमिकेसाठी कोणाची निवड केलीये! अन्नू कपूर यांचा ‘रामायण’ सिनेमावर निशाणा, दिग्दर्शकांनाही मारला टोमणा


Annu Kapoor : अन्नू कपूर यांनी ‘रामायण’ या सिनेमावर टीका केली असून सिनेमाच्या दिग्दर्शकांनाही टोमणा मारला आहे.

Annu Kapoor Slams Sai Pallavi For Ramayana Movie
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेता अन्नू कपूर यांनी पुन्हा एकदा नितेश तिवारी यांच्यावर निशाणा साधला असून ‘रामायण’ सिनेमामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रणबीर कपूर प्रभू रामाची भूमिका साकारत असून, साई पल्लवी देवी सीतेची भूमिका साकारत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी यांचं कौतुक होत असताना, अन्नू कपूर यांनी सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

अन्नू कपूर यांची ‘रामायण’ सिनेमावर टीका

झूमला दिलेल्या एका मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले की, ‘ते फक्त रामानंद सागर यांच्या ‘रामायणा’मध्ये तांत्रिक सुधारणा करतील आणि कदाचित त्याची वेळ वाढवतील. पण, तुम्ही सीतेच्या भूमिकेसाठी कोणाला निवडलं आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. माता सीतेची पूजा एक माता म्हणून केली जाते. या देशात लोक भगवान रामाची पूजा भगवान नारायणाचा अवतार म्हणून करतात. कलाकारांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊ द्या.’
Maharashtra TimesSalman Khan : थकलेले डोळे अन् बारीक शरीरयष्टी; सलमान खानला झालं तरी काय? चाहते चिंतेत, Video व्हायरल
अन्नू कपूर यांनी नितेश तिवारी यांच्या ‘रामायणा’वर अनेकदा टीका केली आहे. २०२३ मध्ये नितेश तिवारी यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासून अन्नू कपूर त्यावर टीका करत आहेत. आज तकला दिलेल्या एका मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले होते की, ‘नितेश तिवारी कोण आहे? त्याचा दर्जा काय आहे? हिंदू धर्माचा अपमान? चित्रपट बनवतोय? त्याला मारहाण होईल. आधी धर्म समजून घ्या आणि मग सिनेमा बनवा.’

नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत

अन्नू कपूर यांनी पुन्हा एकदा दावा केला की, या प्रोजेक्टमागे कोण दिग्दर्शक आहे याची त्यांना काहीच कल्पना नाही. ते म्हणाले, ‘मी नितेश तिवारीला ओळखतही नाही. तो कोण आहे? तो काय करतो? मी चित्रपट पाहत नाही, आणि चित्रपट न पाहिल्यानं माझं काही नुकसान झालं आहे असं मला वाटत नाही. त्याला चित्रपट बनवू द्या.’
Maharashtra TimesSavita Malpekar : 10 दिवस लेक कोमात, डॉक्टरांनीही आशा सोडलेली; सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग, आलेली स्वामींची प्रचिती

दरम्यान, ‘रामायण’बद्दल बोलायचं झाल्यास सिनेमाचा पहिला भाग या दिवाळीत प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्यासोबत विविध कलाकार आहेत. अभिनेता यशने रावणाची भूमिका साकारली आहे, तर सनी देओलनं हनुमान, रवी दुबेनं लक्ष्मण आणि लारा दत्तानं कैकेयीची भूमिका साकारली आहे. अरुण गोविल यांनी राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात इंदिरा कृष्णन, कुणाल कपूर, रकुल प्रीत सिंग, काजल अग्रवाल आणि विवेक ओबेरॉय हे कलाकारही आहेत.