Headlines

Ancestral Property Rights; नातेवाईक, भाऊ-बहीण जमीन वाटपास तयार नाही; खरच संमतीशिवाय जमिनीतला हिस्सा तुम्हाला मिळतो का?


Property Ownership Rules in India: मालमत्तेची केवळ नावावर नोंद आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण मालकी हक्क मिळतील असे मानले जात नाही. कुटुंबातील इतर सदस्यांचेही त्या मालमत्तेवर हक्क असू शकतात. त्यामुळे कोणतेही जमीन किंवा घर विकण्यापूर्वी त्याची कायदेशीर स्थिती स्पष्ट केली गेली पाहिजे जेणेकरून न्यायालयाच्या दृष्टीत तुमचा हक्क मान्य होऊ शकेल.

Property Rights in India
नातेवाईक, भाऊ-बहीण जमीन वाटपास तयार नाही? काय करायचे?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Property Rules : आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यातील मालमत्तेशी संबंधित वाद-विवाद सामान्य बाब आहे. अनेक न्यायालयांमध्ये प्रॉपर्टीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये नातेवारी, सख्खे भाऊ-बहीणच आपले रक्ताचे नाते विसरून फसवणूक करतात. काही प्रकरणात, विशेषतः वडिलोपार्जित मालमत्तेच्या प्रकरणात तर नातेवाईक जमीन वाटून घ्यायला तयार नसतात, त्यामुळे अशा प्रकरणात नेमकं काय केलं पाहिजे? याबाबत लोकांमध्येही कमी अज्ञान असते.

नातेवाईक मालमत्तेची वाटणी करायला तयार नाही तर काय?
तुम्हाला मिळालेल्या जमिनीतुन तुमचा हिस्सा हवा असेल तर संमती किंवा सहकारी हिस्सेदारांच्या संमतीशिवाय कसा मिळवता येतो? त्यासाठी काय करावं लागतं? कोणती कागदपत्र लागतात खरच संमतीशिवाय तुमचा जमिनीतला हिस्सा तुम्हाला मिळतो का? आणि कसा मिळवायचा याबात कदाचितच लोकांना माहिती असेल.
Maharashtra TimesProperty Rights: नातेवाईकांची परवानगी न घेता Joint प्रॉपर्टी विकू शकतो का? वडिलोपार्जित मालमत्ता कशी विकायची? जाणून घ्या नियम
भारतीय कायद्यानुसार पालक (आई-वडील), तसेच वडिलोपार्जित संपत्तीत मुलगा आणि मुलीला समान हक्क-अधिकार दिले गेले आहेत. म्हणजे तुम्हाला हक्क कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही, पण तुमच्याच घरचे तुमचा हक्क तुम्हाला द्यायला नकार देत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाजिले.

नातेवाईक, भाऊ-बहीण जमीन वाटून घेऊन तुम्हाला तुमचा हिस्सा देण्यास तयार नसतील तर, आधी वाटाघाटी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. तरीही त्यांनी नकार दिला तर, दिवाणी न्यायालय किंवा उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयात जाऊन आपल्या हक्काचा दावा करू शकता. भारतीय कायद्यानुसार प्रत्येक कायदेशीर वारसाला वडिलोपार्जित किंवा इतर मालमत्तेत समान वाटा असतो.
Maharashtra Timesमल्टीबॅगर स्टॉकचा जलवा! चंचल बाजारात 1 लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाले 5.5 लाख; 6 महिन्यात दिला बंपर रिटर्न

जमीन वाटून न घेतल्यास काय करायचे?

1. तुम्ही स्थानिक अमीन किंवा पटवारी यांच्याकडून जमिनीचे शासकीय सर्वेक्षण (नकाशा आणि मोजमाप) करून घेऊ शकता. तरीही नातेवाईक शासकीय जमीन सर्वेक्षण करण्यास नकार देत असतील किंवा जमिनीवरील ताबा सोडत नसतील तर, तुम्ही तहसीलदार किंवा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात अर्ज करू शकता.

2. दिवाणी न्यायालयात वाटणीसाठी दावा करा. प्रशासकीय पातळीवरही मुद्द्याचे निराकरण झाले नाही तर, तुम्ही वकिलाच्या माध्यमातून दिवाणी न्यायालयात मालकी हक्काचा दावा दाखल करू शकता. अशाप्रकारे न्यायालय जमिनीची स्पष्ट आणि कायदेशीर विभागणी करते.

3. अशा प्रकारणांमध्ये तुम्हाला जास्त ज्ञान नसेल तर कायदेतज्ज्ञाचा सल्ला घ्या. वकील किंवा कायदेतज्ज्ञ तुम्हाला जमिनीची कागदपत्रे आणि वडिलोपार्जित वाटणीच्या नियमांविषयी माहिती देतील.
Maharashtra TimesEPFO Rule Changes Explained: 3 दिवसांत क्लेम सेटल होणार, पण ठरलेल्या तारखेला PF जमा न झाल्यास मिळणार 12% व्याज, जाणून घ्या नवीन नियम
कोणकोणती कागदपत्रे लागतील
मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकारचा दावा किंवा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • जमिनीचा अपडेटेड 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड
  • Mutation म्हणजे उत्परिवर्तनाचा पुरावा, ज्यावरून जमिनीचा मूळ मालकाची ओळख स्पष्ट होईल.
  • मृत व्यक्तीच्या वारसांची यादी
  • जमिनीचा अधिकृत गाव नमुना नं. 6

(Disclaimer: वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, यामध्ये चुका असू शकतात. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक सल्ला घेण्यासाठी एखाद्या वकील किंवा कायदे तज्ज्ञाशी चर्चा करा.)

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा