Property Ownership Rules in India: मालमत्तेची केवळ नावावर नोंद आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण मालकी हक्क मिळतील असे मानले जात नाही. कुटुंबातील इतर सदस्यांचेही त्या मालमत्तेवर हक्क असू शकतात. त्यामुळे कोणतेही जमीन किंवा घर विकण्यापूर्वी त्याची कायदेशीर स्थिती स्पष्ट केली गेली पाहिजे जेणेकरून न्यायालयाच्या दृष्टीत तुमचा हक्क मान्य होऊ शकेल.

नातेवाईक मालमत्तेची वाटणी करायला तयार नाही तर काय?
तुम्हाला मिळालेल्या जमिनीतुन तुमचा हिस्सा हवा असेल तर संमती किंवा सहकारी हिस्सेदारांच्या संमतीशिवाय कसा मिळवता येतो? त्यासाठी काय करावं लागतं? कोणती कागदपत्र लागतात खरच संमतीशिवाय तुमचा जमिनीतला हिस्सा तुम्हाला मिळतो का? आणि कसा मिळवायचा याबात कदाचितच लोकांना माहिती असेल.
Property Rights: नातेवाईकांची परवानगी न घेता Joint प्रॉपर्टी विकू शकतो का? वडिलोपार्जित मालमत्ता कशी विकायची? जाणून घ्या नियम
भारतीय कायद्यानुसार पालक (आई-वडील), तसेच वडिलोपार्जित संपत्तीत मुलगा आणि मुलीला समान हक्क-अधिकार दिले गेले आहेत. म्हणजे तुम्हाला हक्क कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही, पण तुमच्याच घरचे तुमचा हक्क तुम्हाला द्यायला नकार देत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाजिले.
नातेवाईक, भाऊ-बहीण जमीन वाटून घेऊन तुम्हाला तुमचा हिस्सा देण्यास तयार नसतील तर, आधी वाटाघाटी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. तरीही त्यांनी नकार दिला तर, दिवाणी न्यायालय किंवा उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयात जाऊन आपल्या हक्काचा दावा करू शकता. भारतीय कायद्यानुसार प्रत्येक कायदेशीर वारसाला वडिलोपार्जित किंवा इतर मालमत्तेत समान वाटा असतो.
मल्टीबॅगर स्टॉकचा जलवा! चंचल बाजारात 1 लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाले 5.5 लाख; 6 महिन्यात दिला बंपर रिटर्न
जमीन वाटून न घेतल्यास काय करायचे?
1. तुम्ही स्थानिक अमीन किंवा पटवारी यांच्याकडून जमिनीचे शासकीय सर्वेक्षण (नकाशा आणि मोजमाप) करून घेऊ शकता. तरीही नातेवाईक शासकीय जमीन सर्वेक्षण करण्यास नकार देत असतील किंवा जमिनीवरील ताबा सोडत नसतील तर, तुम्ही तहसीलदार किंवा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात अर्ज करू शकता.
2. दिवाणी न्यायालयात वाटणीसाठी दावा करा. प्रशासकीय पातळीवरही मुद्द्याचे निराकरण झाले नाही तर, तुम्ही वकिलाच्या माध्यमातून दिवाणी न्यायालयात मालकी हक्काचा दावा दाखल करू शकता. अशाप्रकारे न्यायालय जमिनीची स्पष्ट आणि कायदेशीर विभागणी करते.
3. अशा प्रकारणांमध्ये तुम्हाला जास्त ज्ञान नसेल तर कायदेतज्ज्ञाचा सल्ला घ्या. वकील किंवा कायदेतज्ज्ञ तुम्हाला जमिनीची कागदपत्रे आणि वडिलोपार्जित वाटणीच्या नियमांविषयी माहिती देतील.
EPFO Rule Changes Explained: 3 दिवसांत क्लेम सेटल होणार, पण ठरलेल्या तारखेला PF जमा न झाल्यास मिळणार 12% व्याज, जाणून घ्या नवीन नियम
कोणकोणती कागदपत्रे लागतील
मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकारचा दावा किंवा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- जमिनीचा अपडेटेड 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड
- Mutation म्हणजे उत्परिवर्तनाचा पुरावा, ज्यावरून जमिनीचा मूळ मालकाची ओळख स्पष्ट होईल.
- मृत व्यक्तीच्या वारसांची यादी
- जमिनीचा अधिकृत गाव नमुना नं. 6
(Disclaimer: वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, यामध्ये चुका असू शकतात. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक सल्ला घेण्यासाठी एखाद्या वकील किंवा कायदे तज्ज्ञाशी चर्चा करा.)

