Headlines

amravati varud-rajura bazar road auto rickshaw- shivai bus accident five passengers died ; अमरावतीत भीषण अपघात! शिवाई बसची ऑटोरिक्षाला धडक, पाच प्रवाशांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी


ST Bus-Auto Rickshaw Accident: अमरावतीत शिवाई ई-बस आणि प्रवासी ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

amravati accident
अमरावती एसटी बस अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, अमरावती: राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई ई-बस आणि प्रवासी ऑटोरिक्षाच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. वरुड-राजुरा बाजार मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, ऑटोरिक्षातील चौघांचा घटनास्थळीच, तर एकाचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ऑटोचालक कैलाश घनश्याम नागदिवे (४२) रा. वाडेगाव), चिंतामण सदाशिव नागदिवे (६०, रा. वाडेगाव), माही प्रवीण मांगूळकर (१३, रा. वाडेगाव), हरिभाऊ दौलत शिंदे (८३, रा. जरूड) व राजकुमार भलावी (५५, रा. गव्हाणकुंड) अशी मृतांची नावे आहेत. प्रतिभा प्रकाश लाड (१८) आणि मोहिनी वंदे भोरे (१८, रा. राजुरा बाजार) या दोघी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
Maharashtra TimesSSC Student Death: क्रूर नियती! दहावीचा पेपर देऊन घरी परतताना काळाचा घाला; अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू, आई जखमी
एसटी महामंडळाची एमएच ४९, बीझेड ९४३६ या क्रमांकाची शिवाई बस वरुड बसस्थानकातून वर्ध्याकडे निघाली होती. त्याचवेळी एमएच २७ एआर १८२३ क्रमांकाची ऑटोरिक्षा काही विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन वरुडकडे येत होती. वरुडपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगनजीक भरधाव बसने समोरून येणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक दिली. क्षणार्धात ऑटोरिक्षा रस्त्याच्या कडेला फेकल्या गेली. अपघातानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. जखमींना तत्काळ वरुड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान भलावी यांची प्राणज्योत मालवली.
Maharashtra TimesNanded Crime: CRS पोर्टल हॅक अन् 1,700 लोकसंख्येच्या गावात 15,569 बोगस जन्म नोंदी; नांदेडमधील प्रकार, पोलिसांची मोठी कारवाई, झारखंडमधील…
दरम्यान, वरुड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविले. बसचालक निखिल रामभाऊ वरठी (२६, रा. तळेगाव) श्यामजी पंत (आष्टी, जि. वर्धा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. बस भरधाव होती आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा