Headlines

Amravati suspicious death of married girl case filed against in laws; 19 वर्षीय विवाहित सुनेचा मृत्यू, सासऱ्याने वेगळाच बनाव रचला; दफन केलेली बॉडी उकरून बाहेर काढताच भांडाफोड


Amravati crime : नायब तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कबर उकरून तरुणीचा मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृत्यूप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Amravati crime
19 वर्षीय विवाहित सुनेचा मृत्यू, सासऱ्याने वेगळाच बनाव रचला; दफन केलेली बॉडी उकरून बाहेर काढताच भांडाफोड(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती: अमरावती येथील सौदागरपुरा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 19 वर्षीय फाजीला जबील मोहम्मद जुबेर हिच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. विवाहानंतर फाजीला जबील मोहम्मद जुबेर ही नागपूर येथील गोरियानगर, मोमीनपुरा येथे आपल्या सासरी वास्तव्यास होती. मात्र सासरच्या लोकांकडून सतत त्रास होत असल्याची माहिती सदर विवाहितेने वारंवार वडील आणि भावाला फोन करून दिली होती. तसंच 15 मे रोजी “अब्बू मला लवकर अमरावती घेऊन जा,” असा फाजीला हिचा शेवटचा फोनही माहेरच्या लोकांना आला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच तिचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सासरच्या व्यक्तींकडून फाजीला हिच्या माहेरच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच आई-वडील नागपूरला पोहोचले असता फाजीला हिचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत दिसला व तत्काळ दफनविधी करण्याची विनंती सासरच्या व्यक्तींकडून करण्यात आली. मात्र मृतदेह अमरावतीत आणल्यानंतर आंघोळ घालताना गळ्यावर व्रण दिसून आल्यामुळे या संपूर्ण घटनेविषयीचा संशय अधिक बळावला. यानंतर शेकडो नातेवाईकांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशन इथं धाव घेत कारवाईची मागणी केली.

17 मे रोजी नायब तहसीलदार टीना चव्हाण आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कब्र उकरून फाजीलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. प्राथमिक अहवालात गळा आवळणे किंवा श्वसनक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे.

कुटुंबातील व्यक्तींनीच केला घात?

फाजीला हिच्या दिराची पत्नी गर्भवती असल्याने ती माहेरी गेली होती. त्यानंतर दीर फाजीला हिच्यावर वाईट नजर ठेवत होता अशी माहिती तिने आपल्या भावाला फोनवर सांगितल्याची भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन नागपूर येथे मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून पती मोहमद जुबेर , दीर मोहमद इरफान मोहमद जलील व सासरा मोहमद जलील उर्फ संजू पटेल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा