Headlines

Amravati News: आदिती तटकरेंचा मेळघाट दौरा, दुसऱ्याच दिवशी 100 विद्यार्थ्यांना विषबाधा, सरकारी आश्रमशाळेत काय शिजतंय?


Amravati Students Food Poisoning : दोन मंत्र्यांचे दौरे, बैठका आणि सूचनांनंतरही सलग दुसऱ्या दिवशी विषबाधेची घटना घडल्याने प्रशासनाच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

aditi tatkare
मेळघाट आश्रमशाळेत विषबाधा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या अन्नसुरक्षेबाबतचा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. धारणी तालुक्यातील बिजूधावडी आणि सावलीखेडा येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळांतील सुमारे १००पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रविवारी रात्री विषबाधा झाल्याने खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, याच तालुक्यातील टिटंबा आश्रमशाळेत शनिवारी सुमारे ७० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत हे प्रकार घडले आहेत. सलग दोन दिवसांच्या घटनांमुळे विद्यार्थी, पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra TimesRaj Thackeray: ‘जेन-झी’ आंदोलनाने सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरे यांची तिखट टीका
रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी, चक्कर, अतिसार आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने गोंधळ उडाला. बाधित विद्यार्थ्यांना प्रथम स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अधिक त्रास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. टिटंबाप्रमाणेच सावलीखेडा आणि बिजूधावडी आश्रमशाळेलाही टेंभलीतील ‘सेंट्रल किचन’मधून शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा केला जातो. या अन्नपुरवठा व्यवस्थेवर संशय गडद झाला आहे.

प्रशासनाच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
या घटनांतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, टिटंबा घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी रविवारी दुपारी मेळघाटचा दौरा केला. त्यांनी टेंभली ‘सेंट्रल किचन’ची पाहणी केली. उईके यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेउन आवश्यक सूचनाही केल्या. त्यानंतर काही तासांतच हा गंभीर प्रकार घडला. यापूर्वी शनिवारी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही मेळघाट दौऱ्यात आदिवासी बालकांच्या आरोग्य व पोषणाचा आढावा घेतला होता.

Eknath Shinde News | ठाकरे बंधू आणि राहुल गांधींवर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले

टिटंबा येथील घटनेची माहिती घेतली असून आदिवासी विकासमंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडूनही चौकशी होईल. सेंट्रल किचनच्या अन्न तपासणीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अमरावती येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी रविवारी धारणी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची सूचना त्यांनी केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा