Headlines

Amravati District Hospital NICU Fire after Blast Three infants died Crime News; कोवळ्या जीवांचा दुर्दैवी अंत, अमरावतीत NICU मध्ये आग, तीन नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू


Amravati Hospital NICU Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आग लागली.

Amravati NICU Fire _ Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती : जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीत घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही आग लागली. डॉक्टर, परिचारिका आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखल्यामुळे इतर अनेक बालकांचे प्राण वाचल्याची माहिती आहे. एवढी आग लागली असूनही आम्ही स्वतःचा विचार न करता बाळांना वाचवलं, असं दोघा परिचारिकांनी सांगितलं. दोघींची भाजून काळवंडलेले हात त्यांच्या धाडसाची साक्ष देत होते.

लेकरांच्या जन्मानंतर आई-बापांनी पाहिलेली स्वप्नं धुळीस मिळाल्याचं व्यथित करणारं वृत्त समोर आलं आहे. नुकत्याच जन्मलेल्या अवघ्या काही दिवसांच्या बालकांचा डोळे उघडण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे पालकांचा हृदय हेलावणारा आक्रोश पाहायला मिळत आहे.

व्हेंटिलेटरमध्ये स्फोट

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत भाजल्यामुळे तीन नवजात अर्भकांचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesNashik Crime : 43 वर्षीय बॉयफ्रेण्डने नाशिकच्या 34 वर्षीय विवाहितेला संपवलं, सात वर्षांची लेक पोरकी, लग्नबाह्य संबंधांचा दुर्दैवी शेवटतिसऱ्या मजल्यावर एकूण तीन कक्ष असून घटनेच्या वेळी या वॉर्डमध्ये ३९ बालकं असल्याची माहिती आहे. रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी अन्य नवजात बालकांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले. त्यापैकी सहा बालकांवर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.

बावनकुळेंकडून शोक व्यक्त

यशोमती ठाकूर यांचे आरोप

अमरावतीच्या माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाची पाहणी केली. ‘एनआयसीयू’ पूर्णपणे वितळलेलं दिसत आहे. गरीबांची मुलं होती म्हणून मृत्युमुखी पडली, श्रीमंतांची असती, तर वाचली असती, असं मी म्हटलं तर मी राजकारण करतेय अशी टीका होईल. मी पालकमंत्री असताना या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. थाटामाटात उद्घाटन केलं, पण इन्व्हर्टर कुठून आणले, तांत्रिर बिघाडाकडे दुर्लक्ष का झालं, असे सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारले.

Maharashtra TimesHyderabad Accident : भरधाव ॲस्टन मार्टिनची धडक, Inorbit मॉलबाहेर 26 वर्षीय तरुणीचा दुःखद अंत, राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा

मध्य प्रदेशातील घटनेची आठवण

याआधी, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात मध्यरात्री ‘वॉर्मर मशीन’ला आग लागल्याने तीन नवजात बालके भाजल्याची घटना शुक्रवारीच घडली होती. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. वॉर्मर मशीनच्या फिलामेंटमध्ये ठिणग्या उडाल्यामुळे आग लागून त्यात ठेवलेली तीन नवजात बालके भाजली होती. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन उपकरणांचा वापर करुन आग आटोक्यात आणली होती. ‘वॉर्मर मशीन’ हे उपचारादरम्यान रुग्णाच्या शरीराचे तापमान सामान्य पातळीवर राखण्यासाठी वापरले जाणारे एक वैद्यकीय उपकरण आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा