Headlines

Amit shah kolhapur rally 3000 crore projects announcement; अमित शाह यांची इचलकरंजीत मोठी घोषणा! कोल्हापूर-पुण्याला 3 हजार कोटींची भेट; सहकार क्षेत्राला नवी संजीवनी


साईप्रसाद मेहेंद्रकर, कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजीत झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी व साखर उद्योगाला नवी उभारी देणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांची अधिकृत घोषणा केली आहे. एकूण 3,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतुन कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांना व्यवहार, आर्थिक आणि औद्योगिक आधार मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत माजी खासदार आणि सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त इचलकरंजी येथे दोन कार्यक्रम पार पडले. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या स्टेशन रोडवरील भव्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन यावेळी शहांच्या हस्ते पार पडले. तसेच हुपरी येथील साखर कारखान्याचे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. असे नामकरण करण्यात आले.

कोल्हापुरात 1,500 कोटींचा संयंत्रक प्रकल्प

अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया-सामूहिक (संयंत्रक) प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पांतून इथेनॉल, सीबीजी गॅस, सायट्रिक ॲसिड निर्मिती आणि साखर उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचे उत्पादन यांचा समावेश राहील. इथेनॉल व सीबीजी गॅस निर्मितीमुळे साखर कारखान्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील आणि सहकारी संस्थांचा आर्थिक आधार बळकट होईल. तसेच संयंत्रकातून जो नफा होईल, तो महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वितरित केला जाईल, असेही सहकार मंत्र्यांनी असेही स्पष्ट केले. सहकारी साखर कारखान्यांमधून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलवर जीएसटी 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपयांचा परतावा माफ केला असल्याचेही सांगून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात बंद NHEL पुनरुज्जीवनासाठी 1,500 कोटी

दुसरा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील बंद पडलेल्या राष्ट्रीय हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड (NHEL) च्या पुनरुज्जीवनासाठी आहे. यासाठी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक ठेवण्यात येणार असल्याचे शहांनी सांगितले. बंद पडलेल्या उद्योगांना चालू करून स्थानिक रोजगार व सहकारी आर्थिक गतिशीलता वाढविण्याचा उद्देश या प्रकल्पाचा आहे.

“राहुल गांधी, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं?”

सभेत बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवर थेट हल्ला करून विरोधकांच्या शेतकरी-धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. “राहुल गांधी, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानी दावा केला की सध्याच्या केंद्र सरकारने गेल्या 12 वर्षांत शेतकऱ्यांच्या खात्यातून 4 लाख 28 हजार कोटी रुपये थेट लाभ स्वरूपात प्रसारित केले आहेत. तसेच गेल्या 10 वर्षांत शेतकऱ्यांचे 60 हजार कोटींचे कर्ज माफ झाल्याचे शहांनी सांगितले.

इचलकरंजीसाठी पाणीपुरवठा — मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथून इचलकरंजीसाठी 2051 पर्यंत लागणारे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचे नामकरण “राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना” असे करण्यात येणार आहे. योजनेसाठी अंदाजे 500 कोटी रुपये खर्च येणार असून क्षमता 60 एमएलडी असेल.

Maharashtra TimesPune PMP Bus: नव्या बससाठी ‘पीएमपी’ला हवी १०० एकर जागा, काही दिवसांत दाखल होणार बस; प्रवासी सेवा विस्तारणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांचा गुणगौरव करत म्हटले आहे की, “राजकारणात चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई. नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ अमितभाई आहेत, सहकारमधून समृद्धीकडे जात आहोत.” इचलकरंजीतील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्क मैदानावर झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जयकुमार गोरे, हसन मुश्रीफ, संजय सावकारे, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सभेतून इचलकरंजीकरांना संबोधित करताना जाहीर केलेल्या दोन प्रकल्पांतुन साखर उद्योगाला नवे उत्पन्नाचे स्रोत मिळणार असल्याने सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला या नव्या योजनांमुळे नवसंजीवनी मिळणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत