Headlines

Ameesha Patel : ‘क्रिकेटच्या क्रूर जगात ‘रोको’ला जी वागणूक दिली जातेय ती अत्यंत लाजिरवाणी गोष्ट’, बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत


Ameesha Patel Post : अमीषा पटेलनं सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे.

Ameesha Patel On Rohit Sharma
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – भारतीय क्रिकेट संघ सध्या चर्चेत असून आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवांनी भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील रोहित शर्माच्या अपयशानंतर, त्याच्या निवृत्तीच्या सतत अफवा पसरत असून त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, विराट कोहलीनं आपल्या फॉर्ममध्ये टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विराट आणि रोहितची जोडी क्रीडाविश्वात ‘रोको’ म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या काही काळापासून, या जोडीनं भारतीय संघाच्या एकदिवसीय संघात असावं की नाही यावर बरीच चर्चा सुरू आहे. आता, अभिनेत्री अमीषा पटेलनं या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

रोहित शर्माच्या निवृत्तीची आणि आगामी विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघातून त्याला न घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यापासून अमीषाला धक्का बसला आहे आणि ती संतापली आहे. अभिनेत्रीनं अप्रत्यक्षपणे भारतीय संघाच्या मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra TimesAamir Khan : ‘सत्तेसमोर ताठ मानेनं उभं राहणं सोपं नाही!’, RJD चा खासदार वांगचुक यांच्या पाठिशी; आमिर खानवर बरसले

अमीषा पटेलची प्रतिक्रिया

ट्विटरवर पोस्ट शेअर करत भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल बोलताना अमीषा म्हणाली की, ‘हे ट्विट बॉलिवूडशी संबंधित नाही. मी हे अनेक महिन्यांपासून पाहत आहे आणि मला वाटलं की यावर प्रतिक्रिया द्यावी. क्रिकेटच्या या युगात, किंवा त्याऐवजी, क्रिकेटच्या या क्रूर युगात, वरिष्ठ भारतीय खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे, ते पाहून मला साहजिकच धक्का बसला आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’

क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास, सध्या जर कोणी चर्चेत असेल, तर तो आहे रोहित शर्मा. त्याला भारतीय क्रिकेट संघातील एक वरिष्ठ खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेत २०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारताचा एक उत्तम दावेदार मानलं जात होतं. रोहितनं एकदिवसीय सामन्यांमध्ये ११,००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि तो सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही आहे. मात्र, तो सध्या फॉर्मात नाही. अशा परिस्थितीत, निवड समितीनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा रोहित शर्माचा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा असू शकतो. यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये काळजी आणि नाराजी पसरली आहे. यामागील सत्य लवकरच उघडकीस येईल.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा