Headlines

Akola Stamp Officer Kiran Chaudhary Bribery Case 3 Crore Found at Jalgaon Home; सेवानिवृत्तीला फक्त 1 वर्ष, 10 हजारांच्या लाचेपायी एवढ्या वर्षांच्या सेवेला डाग, क्लास-1 अधिकाऱ्याच्या घरात 3 कोटींचं घबाड; प्रकरण काय?


Jalgaon Pravin Chaudhary Bribery Case : लाचखोर प्रकरणातील गुन्हा दाखल असलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरींच्या जळगावच्या घरातून तीन कोटींचं घबाड हाती लागलं आहे.

Jalgaon Pravin Chaudhary Bribery Case
मुद्रांक अधिकारी किरण चौधरी लाचप्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : शासनाकडून लाखोंचा पगार मिळत असूनही पैशांची हाव कमी होईना. सामान्य जनतेकडून लाचखोरीतून कमवलेला अफाट पैसा हा शेवटी नियतीला मान्यच नसतो. अवघ्या 10 हजाराची लाचप्रकरणी अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरींना अटक करण्यात आली आणि त्यांच्याच जळगाव शहरातील घरात तीन कोटींचं घबाड हस्तगत करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

2 कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपयांचं घबाड

अकोला येथे लाचखोर प्रकरणी गुन्हा दाखल झालेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी (वय 57, सध्या रा. अकोला) यांच्या जळगावातील घरात झडतीदरम्यान तब्बल 2 कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपयांचं घबाड पथकाच्या हाती लागलं आहे. घरात जवळपास 3 कोटींचं घबाड असताना 10 हजारांची लाच घेण्याचाही मोह या अधिकाऱ्याला आवरला गेला नाही. विशेष बाब म्हणजे, एका वर्षानंतर चौधरी हे सेवानिवृत्त होणार होते. तरीही त्यांनी लाच घेऊन स्वतःच्या प्रतिमेला काळा डाग लावून घेतला आहे.
Maharashtra TimesRain Update: ढगांबाबत महत्त्वाचे सर्वेक्षण समोर; आढळले काजळीचे बारीक कण, पावसावर कसा परिणाम होणार? जाणून घ्या

विष्णुनगरमधील घर बंद, तरीही…

मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्याविरोधात अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांनुसार 26 जून शुक्रवारी रोजी गुन्हा दाखल झाला. त्यावेळी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) चौधरी यांच्या जळगाव शहरातील घरावर कारवाई करण्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक चौधरी यांच्या विष्णुनगरमधील घर बंद होतं. मात्र, सीलबंद घर असताना देखील 28 जून रविवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता गॅलरीच्या चैनल गेटचं कुलूप तोडून अधिकारी घराची झडती घेणार होते. तेवढ्यात, तेथे काही ऐवज मिळणार नाही, या उद्देशासह चौधरी यांचे नातेवाईक प्रसाद नारखेडे व प्रवीण महाजन या दोघांनी घरात प्रवेश केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
Maharashtra TimesPune News : कष्टाने संसार उभा केला, विषारी दारुमुळे कुटुंब उद्ध्वस्त, दोन घासांसाठी वणवण, धुणेभांडी करण्याची वेळ; पुण्यातील राठोड कुटुंबाचं हृदयद्रावक वास्तव

घरात नेमकं काय सापडलं?

रोख रक्कम 1 कोटी 53 लाख 84 हजार 630 रुपये
सोन्याचे दागिने 422 ग्रॅम किंमत 60 लाख 57 हजार 135 रुपये

संशयित व कुटुंबियांच्या नावे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे 4 लाख 31 हजार 416 किमतीचे

चांदीचे दागिने 154 ग्रॅम, किंमत 31 हजार 416 रुपये
Maharashtra TimesPune Crime: पुण्यातील नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरचं धक्कादायक पाऊल; इमारतीवरून झोकवून देत मृत्यूला कवटाळलं!
सोने खरेदीच्या पावत्या 11 लाख 52 हजार 745 रुपये किमतीच्या

घरातील वस्तू 6 लाख 25 हजार 545 रुपये

घराची इनकॅमेरा झडती

2 जुलै गुरुवार रोजी किरण चौधरी यांच्या पत्नी मनीषा चौधरी या जळगावात आल्या होत्या. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपदेशक रमेश ठाकूर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, रेश्मा अवतारे यासह कर्मचाऱ्यांनी घराची इनकॅमेरा झडती घेतली. त्यावेळी घरात नोटांचं बंडल, मौल्यवान दागिने, मालमत्तेचे कागदपत्रे आणि सोनं खरेदीच्या पावत्या पथकाच्या हाती लागल्या आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा