Headlines

ajinkya rahane retirement wife radhika rahane emotional instagram post last ipl reaction; 20 वर्षांचा प्रवास, निवृत्तीआधीचा प्रसंग, अजिंक्यच्या पत्नीनं इमोशनल पोस्टमधून मन मोकळं केलं, प्रत्येक शब्द बोलका!


Ajinkya Rahane Wife Radhika Post: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर पत्नी राधिका रहाणेने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केली आहे. शेवटच्या IPLपूर्वी अजिंक्यने केलेला खुलासा, त्याचा संपूर्ण क्रिकेट प्रवास आणि कुटुंबाचा अभिमान तिने शब्दांत मांडला आहे.

Ajinkya Rahane Wife Radhika Emotional Post
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार मराठमोळा अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने हा निर्णय काल 30 जुलै रोजी इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर करुन दिला. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला. २० वर्ष देशासाठी खेळणाऱ्या अजिंक्यच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. त्याच्या टीममधील सहकाऱ्यांनीही त्याच्यासाठी विविध पोस्टस लिहिल्या आणि चाहत्यांनीही त्याच्या निवृत्तीच्या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला. त्यानंतर अजिंकच्या घरुन प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती. त्यानंतर काल रात्री अजिंक्यची पत्नी राधिका रहाणे हिने सोशल मीडियावर दोन इन्स्टा स्टोरी शेअर केल्या होत्या. ज्यामध्ये तिने अजिंकच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया असलेले पत्र पोस्ट केले होते. त्यानंतरव आता तिने स्वतःही अजिंक्यसाठी म्हणजे स्वतःच्या नवऱ्याच्या निवृत्तीवर तिची सविस्तर प्रतिक्रिया असणारी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने नेमकं काय म्हटलं आहे, जाणून घ्या.

राधिकाची पोस्ट जशीच्या तशी

“या आयपीएल (IPL) सीझनसाठी जेव्हा तू एअरपोर्टवर निघत होतास, अगदी लिफ्टमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी तू म्हणाला होतास, ‘चलो राड्स, शेवटच्या सीझनसाठी निघतोय. शेवटच्या वेळी एकदा हे पूर्ण ताकदीने करायचंय.’ ते ऐकून मी तिथेच स्तब्ध उभी राहिले. मला काय बोलावे किंवा कशी प्रतिक्रिया द्यावी, काहीच सुचत नव्हते. त्या एकाच क्षणात आठवणींचा महापूर डोळ्यांसमोरून तरळून गेला… तुझा संपूर्ण प्रवास एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांसमोर उभा राहिला. ते पहाटेचे वर्कआउट्स आणि सरावाचे सत्र, सामन्यापूर्वीची ती मनातली हुरहूर, टीम सिलेक्शन वेळचा तो ताण, सातत्याने चालणारं ते बॅग भरणं आणि रिकामं करणं, तुझा कडक शिस्तबद्धपणा, त्याग आणि समर्पण… तुझ्या एका क्रिकेटपटूच्या आयुष्याला आकार देणाऱ्या या प्रत्येक गोष्टीची आठवण झाली.

Maharashtra TimesAjinkya Rahane Retirement : तुझं जास्त कौतुक झालं नाही, पण तरीही तूच आमचा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई-वडिलांचं भावूक पत्र

हे सर्व काही आता कुठेतरी थांबणार आहे, या विचारानेच मन भरून आले होते. आणि आता जेव्हा तो क्षण खरोखरच समोर आला आहे, तेव्हा मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मैदानावरील तुझ्या सर्व यशाबद्दल तर वाटतोच, पण या संपूर्ण प्रवासात तू एक माणूस म्हणून जसा राहिलास, त्याबद्दल मला तुझा जास्त अभिमान आहे.

Maharashtra TimesODI World Cup 2027 : वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2027बाबत ICCकडून मोठी घोषणा, आता 12 नाहीतर 14 संघ आणि 57 सामने, कसा असणार फॉरमॅट? जाणून घ्या

तुझ्या या प्रवासाचा एक भाग व्हायला मिळाले आणि हा संपूर्ण प्रवास इतक्या जवळून अनुभवता आला, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान मानते.

तुझ्या या प्रवासाने केवळ मलाच नाही, तर या खेळावर प्रेम करणाऱ्या करोडो लोकांना प्रेरणा दिली आहे. तू क्रिकेटला तुझा आत्मा आणि पूर्ण हृदय अर्पण केलेस आणि बदल्यात या खेळाने तुला आयुष्यभर जपता येतील अशा आठवणी दिल्या. प्रत्येक चढ-उतारात तू तुझ्या ‘अजिंक्य’ या नावासारखाच बाणा जपलास आणि खरा ‘अजिंक्य’ राहून दाखवलेस. आर्या, राघव आणि मी… आयुष्याच्या पुढच्या टप्प्यातही तुझ्यासाठी नेहमीच असेच चिअर करत राहू!

Maharashtra TimesAjinkya Rahane : आणखी काय हवं! माझा सर्वात लाडका पार्टनर, अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर दिग्गजांच्या आभाळभर शुभेच्छा, यशाचा गाजावाजा न करणारा क्रिकेटपटू

“वारसा कायम अमर राहील”

दरम्यान, राधिकाने या पोस्टमध्ये काही फोटो जोडले आहेत. हे फोटो अजिंक्यच्या कारकिर्दीतील काही ऐतिहासिक प्रसंगांचे आहेत. शेवटी तिने लिहिलं की,
“हा असा कमबॅक आहे, जो आपण कधीच विसरू शकणार नाही. शेवटची ती एक इनिंग… पण आठवणी मात्र अगणित. एक अध्याय इथे संपतोय… पण तुझा वारसा मात्र कायम अमर राहील.”