Headlines

Aditi Sharma : लोकप्रिय अभिनेत्रीची पोलीस ठाण्यात धाव, पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप; सासू विरोधातही दाखल केली तक्रार


Aditi Sharma : लोकप्रिय अभिनेत्री अदिती शर्मानं पतीवर आणि सासूवर घरगुती हिंचाराचा आरोप केला असून तक्रार दाखल केली आहे.

Aditi Sharma Files FIR Against Husband And Mother In Law
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मानं तिचा पती अभनीत कौशिक आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीनं त्यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ही तक्रार मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, तिचा पती, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद कीर्ती कौशिक यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

अभिनेत्रीनं दाखल केली तक्रार

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. अदितीच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर छळ सुरू झाला. अभिनेत्रीनं तिचा पती आणि त्याच्या कुटुंबावर वारंवार होणारा छळ, मारहाण आणि तिचे दागिने जप्त करणे यांसह अनेक आरोप केले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानं मनोरंजन क्षेत्रातील घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra TimesMilind Pathak : ‘रील स्टार्सना सिनेमाच्या प्रमोशनसाठी बोलावतात, ज्यांनी सिनेमा बनवला त्यांच्या कष्टाला किंमत नाही’, मराठी अभिनेत्याचं बेधडक वक्तव्य
अदिती शर्मा आणि अभनीत कौशिक यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी गोरेगाव येथील त्यांच्या घरी एका खाजगी समारंभात लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच ते विभक्त झाले. अदिती शर्मानं नुकतीच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, ज्यात तिनं दावा केला आहे की, नोव्हेंबर २०२४ मध्ये अभिनीत कौशिकशी लग्न केल्यानंतर तिला शाब्दिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळाला सामोरं जावं लागलं. सुरुवातीला तिची भांडणं तिच्या कपड्यांवरून व्हायची. पण नंतर त्याचं रूपांतर गंभीर मुद्द्यांमध्ये झालं. अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, तिचा नवरा घरखर्चात हातभार लावण्याऐवजी अनेकदा तिच्याकडून पैसे घ्यायचा. तो तिच्यावर संशय घ्यायचा, तिचा मोबाईल फोन तपासायचा.
अदिती शर्मानं तिच्या सासूवर सोन्याचे दागिने जप्त केल्याचा आरोपही केला आहे. सासू आणि नणंद भांडण सोडवण्याऐवजी तिच्या नवऱ्याला पाठिंबा द्यायची, असंही अभिनेत्रीनं तक्रारीत म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

अदिती शर्मा आणि अभनीत कौशिक यांचं लग्न

अदिती शर्मा आणि अभनीत कौशिक यांची पहिली भेट जून २०२१ मध्ये एका ऑनलाइन अभिनय वर्गात झाली. त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये गोरेगाव येथील त्यांच्या घरी लग्न केलं.