Aditi Sharma : लोकप्रिय अभिनेत्री अदिती शर्मानं पतीवर आणि सासूवर घरगुती हिंचाराचा आरोप केला असून तक्रार दाखल केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मानं तिचा पती अभनीत कौशिक आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीनं त्यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ही तक्रार मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, तिचा पती, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद कीर्ती कौशिक यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
अभिनेत्रीनं दाखल केली तक्रार
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. अदितीच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर छळ सुरू झाला. अभिनेत्रीनं तिचा पती आणि त्याच्या कुटुंबावर वारंवार होणारा छळ, मारहाण आणि तिचे दागिने जप्त करणे यांसह अनेक आरोप केले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानं मनोरंजन क्षेत्रातील घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. Milind Pathak : ‘रील स्टार्सना सिनेमाच्या प्रमोशनसाठी बोलावतात, ज्यांनी सिनेमा बनवला त्यांच्या कष्टाला किंमत नाही’, मराठी अभिनेत्याचं बेधडक वक्तव्य अदिती शर्मा आणि अभनीत कौशिक यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी गोरेगाव येथील त्यांच्या घरी एका खाजगी समारंभात लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच ते विभक्त झाले. अदिती शर्मानं नुकतीच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, ज्यात तिनं दावा केला आहे की, नोव्हेंबर २०२४ मध्ये अभिनीत कौशिकशी लग्न केल्यानंतर तिला शाब्दिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळाला सामोरं जावं लागलं. सुरुवातीला तिची भांडणं तिच्या कपड्यांवरून व्हायची. पण नंतर त्याचं रूपांतर गंभीर मुद्द्यांमध्ये झालं. अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, तिचा नवरा घरखर्चात हातभार लावण्याऐवजी अनेकदा तिच्याकडून पैसे घ्यायचा. तो तिच्यावर संशय घ्यायचा, तिचा मोबाईल फोन तपासायचा. अदिती शर्मानं तिच्या सासूवर सोन्याचे दागिने जप्त केल्याचा आरोपही केला आहे. सासू आणि नणंद भांडण सोडवण्याऐवजी तिच्या नवऱ्याला पाठिंबा द्यायची, असंही अभिनेत्रीनं तक्रारीत म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अदिती शर्मा आणि अभनीत कौशिक यांची पहिली भेट जून २०२१ मध्ये एका ऑनलाइन अभिनय वर्गात झाली. त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये गोरेगाव येथील त्यांच्या घरी लग्न केलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा