Accident car falls 20 feet into a ditch on samruddhi highway mother and daughter death on spot; मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघाले, पण कार पुलावरून थेट २० फूट खाली कोसळली; माय-लेकीचा जागीच मृत्यू
Accident car falls 20 feet into a ditch on samruddhi highway mother and daughter death on spot; मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघाले, पण कार पुलावरून थेट २० फूट खाली कोसळली; माय-लेकीचा जागीच मृत्यू
Samruddhi Highway Accident: भीषण अपघातामध्ये कारमधील महिलेसह तिच्या अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघाले, पण कार पुलावरून थेट २० फूट खाली कोसळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला आहे. मुंबईहून अमरावतीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेली ही कार महामार्गाचा सुरक्षा कठडा तोडून थेट २० फूट खाली ओढ्यावरील पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातात कारमधील महिला आणि तिच्या अवघ्या ८ वर्षांच्या चिमुरड्या मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवार ७ जून लासूर स्टेशननजीक असलेल्या डोणगाव परिसरात हा अपघात घडला. कारचा चक्काचूर झाला असून या अपघाताने महामार्गावर खळबळ उडाली होती. हुमेरा मोहसिन शेख वय ३१, रा. कल्याण आणि हरिम जुनेद अहमद वय ८, रा. ठाणे अशी मृत पावलेल्या माय-लेकीची नावे आहेत.
या अपघाताप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून एक कुटुंब कारने (MH 04 FF 5840) अमरावतीच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून निघाले होते. रविवारी कार डोणगाव परिसरातील एका ओढ्यावरील पूल चॅनल क्र. ४९६ जवळ आली. याच दरम्यान भरधाव कारचे एक टायर अचानक मोठ्या आवाजासह फुटले. टायर फुटल्याने चालकाला कारवर नियंत्रण ठेवता आले नाही. कार थेट महामार्गाची सुरक्षा भिंत (कठडा) तोडून थेट २० फूट खोल नाल्यात कोसळली.
अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश काळे आपल्या पथकासह तातडीने पोहोचले. पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि महामार्ग कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढले. या दुर्घटनेत खालील ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील ‘घाटी’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी हुमेरा शेख आणि हरिम अहमद यांना मृत घोषित केले. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा