Abhijeet Kelkar Post : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून यासंदर्भात मराठी अभिनेता अभिजीत केळकरनं केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेले अधिकारी कोण असतील, तर ते आहेत भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे . तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त दूध, चीज, गुटखा आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. मे २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून, मुंडे त्यांच्या कठोर निर्णयांसाठी चर्चेत आहेत. अशातच आता मराठी अभिनेता अभिजीत केळकरनंही तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे.
अभिजीत केळकर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अनेक सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर तो आपलं मत मांडतो. अभिनेत्यानं आता सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्यानं फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘तुकाराम मुंढे साहेबांचा, कामाचा आणि कारवायांचा धडाका पाहता त्यांच्याकडे तात्काळ शिक्षण खातंही सोपवायला हवं, असं अगदी मनापासून वाटतंय. म्हणजे, प्रायव्हेट शाळांची मनमानी, मुजोरी, बेफिकिरी, विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही गळचेपी, ह्या सगळ्याला आपोआप चाप बसेल आणि सिस्टीम खऱ्या अर्थाने, ‘मुळापासून’ स्वच्छ व्हायला सुरुवात होईल…देवेंद्र फडणवीसजी, कृपया हे करा…’ नेटकऱ्यांनी अभिजीतच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, मे २०२६ मध्ये एफडीएचा (FDA) कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली. त्यांनी दूध, चीज, खाद्यतेल आणि औषधांमधील भेसळी विरोधात कारवाई केली. अलीकडेच, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात बनावट दूध आणि चीज बनवणाऱ्या अनेक युनिट्सवर छापे टाकण्यात आले. मुंढे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, दूध हा केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या पोषणाचा पाया आहे आणि त्यातील भेसळ खपवून घेतली जाणार नाही.
Tukaram Mundhe’s FDA Action On Goras Bhandar खंडपीठानं झापलं, आता नोटीस देणार
यापूर्वी, दूध आणि चीज व्यतिरिक्त, मुंडे यांनी गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधातही मोहीम सुरू केली होती. वृत्तानुसार, महाराष्ट्रातील शेकडो ठिकाणी छापे टाकण्यात आले. इतकंच नाही, तर औषधांच्या नावांमध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे बाजारातून कोट्यवधी रुपयांची औषधे परत मागवण्याचे आदेश जारी करण्यात आले.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा