Headlines

Abhijeet Dipke यांनी दुरावस्था दाखवली, Dada Bhuse टार्गेटवर येताच Eknath Shinde यांचा अॅक्शन प्लॅन – eknath shinde school education mission mode cjp dada bhuse maharashtra schools


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण विभागाला ‘मिशन मोड’वर काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत त्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला. मात्र या बैठकीचा टायमिंग फार महत्त्वाचा आहे. देशात NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा झाल्यानंतर आपल्या राज्यातही गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जातीय. त्यातच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही आता आपला मोर्चा महाराष्ट्रातील शाळांकडे वळवला असून शिक्षण व्यवस्थेला उडलेला बोजवारा दाखवायला सुरूवात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे काय तर, आपली चूक मान्य करत सरकारकडून भुसेंनीही तात्काळ दखल घेत त्रुटी स्वीकारल्या होत्या. त्यानंतर आता दोनच दिवसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील शाळांवरून महत्त्वाची बैठक घेत अनेक सूचना केल्यात. त्यामुळं सरकारनं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा चांगलाच धसका घेतल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. तर, दीपके आणि सीजेपीच्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचं बोललं जातंय. तेव्हा शाळांवरून दादा भुसे टार्गेटवर आल्यानच सरकार वेगानं कामाला लागलाय का,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शालेय शिक्षण विभागासह त्यांच्या प्रत्येक आमदाराला कोणत्या सूचना केल्यात, शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणता कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिलेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#EknathShinde #DadaBhuse #MaharashtraEducation #RightToEducation #MaharashtraSchoolEducation #SchoolEducation #MarathiSchools #MaharashtraSchools #SchoolEducationNews #MaharashtraEducationNews #CJP #CockroachJantaParty #AbhijeetDipke #AbhijeetDipkeCJP #CJPNews #CJPProtest #MaharashtraPolitics #MaharashtraGovernment #EducationSystem #SchoolNews #MarathiNews #MaharashtraNews #PoliticalNews #EducationMinisterDadaBhuse #EknathShindeCJP #DadaBhuseControversy #SchoolThikKaro #SchoolInspection #EducationNews #SchoolInfrastructure #GovernmentSchools #SchoolStudents #EducationPolicy #NEET #EducationControversy #EducationUpdatesDeputy CM Eknath Shinde has directed Maharashtra’s School Education Department to work in “mission mode” to bring major reforms to the state’s education system. The timing of the meeting is significant, as School Education Minister Dada Bhuse has been facing demands for his resignation over issues concerning schools. With CJP founder Abhijeet Dipke also raising questions about the state’s education system, the government has now ordered several key measures, including a detailed action plan for school modernization. Is the government stepping up after the controversy? Let’s look at the key instructions given by Eknath Shinde.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत