Headlines

Aamir Khan Wedding Preparation In Mumbai Heavy Rains ; Aamir Khan Wedding Updates : लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई! मुसळधार पावसातही आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची जय्यत तयारी, बहिणी व नातेवाईकांची लगबग सुरू


Aamir Khan Home Video : मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस असताना आमिर खानच्या घरी मात्र लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येते.

aamir khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाला आहे. 5 जुलै रोजी आमिर खान त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्राटसोबत लग्न करणार आहे. या जोडप्याने लग्नाची बातमी अधिकृत केली असून त्यांच्या या खास दिवसाबाबतची माहितीही दिली होती. लग्नाचा दिवस जवळ येत असल्यामुळे, पाली हिल येथील आमिर खानचे घर या सोहळ्यासाठी छान सजवलेले जात असल्याचे दिसून येत आहे. याच घरात हे लग्न होईल.

लग्नाच्या विधींच्या आदल्या दिवशी, म्हणजेच 4 जुलै रोजी, मुंबईतील पाली हिल येथील अभिनेत्याचे घर पूर्णपणे सजवलेले दिसले. अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेरील दृश्ये पापाराझींनी व्हिडिओद्वारे शेअर केली. प्रसारमाध्यमांनी शेअर केलेल्या क्लिप्समध्ये हे घर लायटिंगच्या रोषणाईने उजळून निघालेले दिसत होते. तसेच, पाहुण्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यासाठी फर्निचर आणतानाही काही कामगार तिथे दिसले.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेटफ्लिक्सवर पाहतायत द ब्लॅकलिस्ट सीरिज, टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शोचेही मोठे चाहते

मुंबईतील पावसाच्या वातावरणात लग्नाची तयारी

मुंबई हवामानाशी संबंधित इशाऱ्यांचा सामना करण्यात आला आहे. मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. असे असूनही, खराब हवामानाची पर्वा न करता आमिर खानच्या लग्नाची तयारी जय्यत सुरूच आहे. अभिनेत्याची बहीणही घरी दाखल होताना दिसली आणि मुसळधार पावसात काही लोक घरात सामान नेताना दिसून आले.

Maharashtra TimesTharala Tar Mag : साडेतीन वर्षांची मेहनत पाण्यात गेल्याचं समजताच हादरली प्रिया, अखेर सायली हीच तन्वी असल्याचा सुभेदार किल्लेदारांसमोर खुलासा

आमीरने केली लग्नाची घोषणा

मुंबईत ‘प्रीतम अँड पेड्रो’च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आमिर खानने लग्नाच्या बातम्यांना दुजोरा दिला की, तो 5 जुलै रोजी गौरी स्प्राटशी लग्न करणार आहे. त्याने पुढे सांगितले की, हा विवाहसोहळा एक खाजगी कार्यक्रम असेल आणि तो त्याच्या घरी, जवळचे कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडेल.

पाहुण्यांच्या यादीपासून ते जेवणाच्या मेनूपर्यंत…

हे जोडपे ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’ अंतर्गत आपल्या लग्नाची अधिकृत नोंदणी करून लग्न करतील आणि त्यानंतर पाहुण्यांसाठी एका खासगी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नाच्या सर्व तयारीबाबत साधेपणा राखण्यालाच आमीर आणि गौरी यांनी पसंती दिली आहे. पाहुण्यांची यादी निश्चित करण्यापासून ते स्नेहभोजनाचा मेनू ठरवण्यापर्यंतच्या संपूर्ण नियोजनात ते स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. या सोहळ्याला जवळचे नातेवाईक, काही खास मित्र आणि काही चित्रपटसृष्टीतील व्यक्तींसह सुमारे 100 ते 150 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. स्नेहभोजनाचा मेनूही साधाच ठेवण्यात आला असून, त्यात या जोडप्याच्या वैयक्तिक आवडीनिवडींचे प्रतिबिंब दिसून येते.

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांची उपस्थिती

या विशेष प्रसंगी त्यांची मुले आणि जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार असल्याचे बोलले जाते. पाहुण्यांच्या यादीत चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा