Headlines

Aamir Khan Gauri Spratt Wedding Update ; Aamir Khan Wedding : आमिर खान गौरी स्प्राटच्या लग्नात 100 पाहुण्यांनाच आमंत्रण, दोन मित्रांची नावं समोर, जेवणाच्या मेन्यूची अभिनेत्याने जातीने घेतली काळजी


Aamir Khan Gauri Spratt Wedding Update : अभिनेता आमिर खान येत्या 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाचे खास अपडेट्स आता समोर येऊ लागले आहेत.

aamir gauri
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दोन अयशस्वी लग्नानंतर, आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाला आहे. तो 5 जुलै रोजी आपली गर्लफ्रेंड गौरी स्प्राटसोबत लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वीच आमिरने तिसऱ्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला होता. हा सोहळा अत्यंत खाजगी स्वरूपाचा असेल. लग्नाला केवळ कुटुंबीय आणि काही मोजके जवळचे मित्र उपस्थित राहणार असल्याचे त्याने सांगितले.

आमिर खान आणि गौरी स्प्राट यांच्या लग्नासाठी केवळ 100 ते 150 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या पाहुण्यांच्या यादीत कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील काही मोजक्या व्यक्तींचा समावेश असेल.

आमिर आणि गौरी यांनी पाहुण्यांच्या यादीपासून ते दुपारच्या जेवणाच्या मेनूपर्यंत सर्व गोष्टींचे नियोजन स्वतः केले.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार आमिर आणि गौरी यांनी पाहुण्यांच्या यादीपासून ते दुपारच्या जेवणाच्या मेनूपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे नियोजन स्वतः केले. लग्नाची सुरुवात ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’ अंतर्गत रजिस्टर मॅरेजने होईल आणि त्यानंतर पाहुण्यांसाठी दुपारच्या जेवणाचे आयोजन केले जाईल.

Maharashtra TimesBharat Jadhav : पछाडलेला सिनेमा मिळेल अशी आशाच सोडलेली, पण भरत जाधवसाठी लक्ष्मीकांत बेर्डे आलेले धावून, एक फोन काम डन!

मेनूमध्ये आमिर आणि गौरीच्या आवडत्या पदार्थांचा समावेश

अहवालात असेही नमूद केले आहे की, मेनूमध्ये आमिर आणि गौरीच्या काही आवडत्या पदार्थांचा समावेश आहे. या तयारीमध्ये दोघेही स्वतः सहभागी होते. पाहुण्यांच्या यादीत आमिर खानचे जुने मित्र, जसे की आशुतोष गोवारीकर आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी ज्यांनी आमिरच्या निर्मितीखालील ‘बटवारा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते यांचा समावेश असू शकतो.

Maharashtra TimesYatin Karyekar : मराठी अभिनेत्रीसोबत लग्न अन् घटस्फोट, डिप्रेशनमध्ये गेलेले यतीन कार्येकर, दारूचं व्यसनही लागलेलं; सांगितली आपबिती

“हा अत्यंत खाजगी स्वरूपाचा विवाह सोहळा”

विशेष म्हणजे, ‘प्रीतम अँड पेड्रो’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित असताना आमिर खानने आपल्या आयुष्यातील या खास क्षणाबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, “हो, मी 5 जुलै रोजी लग्न करत आहे; हा अत्यंत खाजगी विवाह सोहळा आहे आणि आम्ही तो घरीच आयोजित करत आहोत. 5 तारीख आमच्यासाठी खूप खास आहे; यात केवळ दोन्ही कुटुंबे आणि काही जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. आम्ही हा सोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि घरीच साजरा करत आहोत. आम्हाला सर्वांचे आशीर्वाद हवेत.”

गौरी काय करते आणि ती कुठे राहते?

गौरीबद्दल सांगायचे तर, ती मूळची बेंगळुरूची आहे. ती फॅशन, सौंदर्य आणि वेलनेस क्षेत्रात काम करते. सध्या मुंबईत राहते. तिचे आणि आमिर खानचे नाते खूप जुने असल्याचे सांगितले जाते. अहवालांनुसार, त्यांची पहिली भेट सुमारे 25 वर्षांपूर्वी झाली होती, परंतु काही काळ त्यांचा संपर्क तुटला होता. अनेक वर्षांनंतर ते पुन्हा संपर्कात आले आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अलीकडेच, आपल्या 60 व्या वाढदिवसानिमित्त आमिर खानने गौरीची प्रसारमाध्यमांशी ओळख करून दिली आणि पहिल्यांदाच त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून, हे जोडपे अनेकदा हातात हात घालून एकत्र फिरताना दिसले आहे.

आमिरला आधीच्या दोन लग्नापासून तीन मुलं आहेत. तर गौरीला एक मुलगा आहे. आमिर खान यांचे पहिले लग्न 1986 मध्ये रीना दत्ताशी झाले होते आणि 2002 मध्ये ते वेगळे झाले; त्यांना जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले आहेत. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी चित्रपट निर्माती किरण राव यांच्याशी विवाह केला, परंतु 2021 मध्ये त्यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली. किरण यांच्यापासून त्यांना आझाद हा मुलगा आहे, ज्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा