Sachin Ahir : ‘ऑपरेशन टायगर ‘ मोहिमेत सहा खासदार, विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांच्यानंतर आणखीही काही शिलेदार सामील होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच चकित केले. प्रवेश करताच महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या उमेदवारीची माळही त्यांच्या गळ्यात पडली. महाविकास आघाडीकडील आकडे पाहता महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात असतानाच नुकतीच त्यांची बिनविरोध निवडही झाली. ठाकरेसेनेची ताकद मोडून काढण्यासाठी शिवसेने आक्रमकपणे राबवलेल्या ‘ ऑपरेशन टायगर ‘ मोहिमेत सहा खासदार, विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांच्यानंतर आणखीही काही शिलेदार सामील होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
सुनील शिंदेही साथ सोडणार?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याभोवती चक्रव्यूह रचण्यासाठी शिंदेसेनेने मोठी चाल खेळली आहे. सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जात. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना दोन वेळा निवडून आणण्यात सचिन अहिर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी मविआतून महायुतीत उडी घेतल्यानंतर पुढील निवडणुकीत वरळीतून आदित्य ठाकरेंना विजय मिळवणं कठीण झालं आहे. अशातच ठाकरेंच्या वरळीतील विजयाचे दुसरे शिल्पकार मानले जाणाऱ्या सुनील शिंदे यांच्यावरही शिंदेंची नजर पडल्याची चर्चा होती. Vihan Shrivastav Mother : माझा विहान येईल आणि क्रिकेट खेळायला जाईल! स्कूलबस अपघातात लेकाचा मृत्यू, आई हातात बॅट घेऊन शून्यात हरवलेली
आदित्य ठाकरेंचा विजय बिकट
वरळीतून आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चक्रव्यूह रचले आहे. गेल्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मिलिंद देवरा यांना शिवसेनेकडून मैदानात उतरवत आदित्य ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न केला. ६३ हजार मतांसह आदित्य ठाकरे विजयी झाले असले, तरी जेमतेम १० हजारांच्या मताधिक्याने त्यांनी बाजी मारली होती. मनसेकडून संदीप देशपांडेंनी उडी घेतल्याने लढत तिरंगी झाली आणि त्यांनी २० हजार मतं खालली. परंतु याआधी २०१९ मध्ये आदित्य ठाकरेंचा अविरोध विजय झाला असताना २०२४ मधील विजयाची वाटचाल थकवणारी होती. आता २०२९ मध्ये जिंकणं अधिक बिकट असल्याचं भाकित तीन वर्ष आधीच वर्तवलं जात आहे.
सचिन अहिर यांना एकनाथ शिंदेंकडून गिफ्ट; उपसभापती पदाबाबत नीलम गोऱ्हे थेट बोलल्या
सुनील शिंदेंपुढे चक्रव्यूह
दुसरीकडे, ज्या सुनील शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या विजयात वाटा उचलला, त्यांनाही शिवसेनेकडे खेचले जात असल्याची चर्चा आहे. खुद्द सुनील शिंदेंनी या केवळ अफवा असल्याचं सांगत चर्चा उधळून लावल्या असल्या, तरी सध्याच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे अहिर हे धनुष्यबाणावर विधान परिषदेत निवडून आले, असे सांगत शिंदेंनी ते शिवसेनेत असल्याचे म्हटले, तोच निकष आता सुनील शिंदेंच्या बाबतीतही लागू होतो. Sachin Ahir : उपसभापती करा किंवा मंत्रिपद द्या, अहिरांनी दिलेले दोन पर्याय; ठाकरेंच्या तीन शिलेदारांची शिंदेंशी गुप्त चर्चा अहिरांप्रमाणेच सुनील शिंदे यांचा विधान परिषद कार्यकाळही २०२८ पर्यंत आहे. परंतु महाविकास आघाडीची सध्याची आकडेवारी पाहता त्यांना पुन्हा विधान परिषदेवर निवडून जाणे शक्य दिसत नाही. त्यामुळे सुनील शिंदेंनीही बाजू बदलली, तर आदित्य ठाकरेंना विजय अवघड होईल.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा