Headlines

Jain Muni Nileshchandra Statement on Uddhav Thackeray


अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरीप्रकरणी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (18 जुलै) नागपुरात ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरून जैन मुनी निलेशचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक आणि आक्रमक शब्दांत टीका

.

‘त्यांना धड वाचताही आलं नाही’

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दादरमध्ये झालेल्या रामरक्षा आंदोलनाचा संदर्भ देत मुनी निलेशचंद्र म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं आंदोलन मी पाहिलं, त्यांना रामरक्षा धड वाचता देखील आली नाही. बाळासाहेबांचे विचार आता पूर्णपणे संपलेले आहेत.”

‘त्यांना कुराण द्यायला पाहिजे’

ठाकरेंवर निशाणा साधताना ते म्हणाले, “जेव्हा त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची गरज होती, तेव्हा त्यांनी नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये टाकलं. उद्धव ठाकरेंना कुराण द्यायला पाहिजे होतं, रामरक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही. त्यांनी आधी कुराण वाचावे, त्यांना कुराणची गरज आहे.”

‘आमची दानपेटी आम्ही बघून घेऊ’

राम मंदिरातील चोरीच्या मुद्द्यावर बोलताना मुनी म्हणाले, “राम आमच्या आस्थेचं केंद्र आहे. मंदिरात जी चोरी झाली ते आम्ही बघून घेऊ, आमची दानपेटी आहे. रामाला धन आणि वैभवाची गरज नाही. आता जी बाबरी मस्जिद बनत आहे, तिथेही घोटाळा झाला आहे, त्याच्या विरोधात तुम्ही काही करणार नाही का? हे फक्त हिंदुत्वाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.”

‘शुद्धीकरणाची गरज’

“उद्धव ठाकरेंना श्राप लागलेला असून, त्यांना शुद्धीकरण करण्याची गरज आहे,” असेही मुनी निलेशचंद्र यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाराष्ट्रातले राम’ असा उल्लेख करत सरकारची बाजू घेतली.

नागपुरात आंदोलनाची जय्यत तयारी

दरम्यान, नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात आज होणाऱ्या आंदोलनासाठी शिवसेना (UBT) कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भगव्या पताका, फुलांची सजावट आणि ‘रामद्रोह, हिंदुद्रोह, म्हणजे देशद्रोह’ आशयाचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत; नवनीत राणांची टीका

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणा यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘जनाब उद्धव ठाकरे’ असा करत त्यांना थेट अयोध्येचे दर्शन आणि हनुमान चालिसा प्रकरणाची आठवण करून दिली.

‘जनाब उद्धव ठाकरेंना’ रामलल्लाची आठवण कशी झाली?

“जेव्हा अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहिले आणि देश-विदेशातून भक्त तिथे गेले, तेव्हा ‘जनाब’ उद्धव ठाकरे कुठे लपले होते?” असा बोचरा सवाल राणा यांनी केला. “पक्ष बरबाद झाल्यानंतर, आमदार आणि खासदार सोडून गेल्यानंतर आता त्यांना रामलल्लाची आणि रामरक्षेची आठवण आली आहे. जे कधी दर्शनालाही गेले नाहीत, ते रामरक्षा काय करणार? ते रामरक्षा करत नाहीत, तर उरलेल्या पक्षाची ‘पक्षरक्षा’ करत आहेत,” असा सणसणीत टोला नवनीत राणा यांनी लगावला.

हेही वाचा…

सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह नेत्यांच्या प्रतिक्रिया

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत