Headlines

Sameera Reddy : अनोळखी मुलानं भर रस्त्यात छेड काढली, शाळकरी वयात लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडलेला भयंकर प्रकार, सांगितला प्रसंग


Sameera Reddy Dangerous Incident : लोकप्रिय अभिनेत्री समीरा रेड्डीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

Sameera reddy
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा बालपणी विनयभंग झाला होता. त्याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

समीरा रेड्डीनं सांगितला प्रसंग

समीरा रेड्डीनं सांगितलं की, ती शाळेत असताना मुंबईतील वांद्रे येथे तिचा विनयभंग झाला होता. समीरा रेड्डी म्हणाली की, ‘मी माझी शाळेची बॅग घेऊन शाळेत जात होते. शाळेत असताना मी हेल्थी मुलगी होते. मी शाळेत चालत जात असताना एक मुलगा सायकलवरून आला. त्यानं माझ्या छातीवर जोरात मारलं आणि तो हसायला लागला. असं करण्यात त्याला काय आनंद मिळत होता हे मला माहीत नाही. तो एक तरुण मुलगा होता, कदाचित १४ किंवा १५ वर्षांचा असेल.’

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

‘त्यानं मला खूप जोरात मारलं आणि सायकल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कृत्यामुळे मला इतका राग आला की मी माझी शाळेची बॅग आणि बाटली फेकून त्याच्या मागे धावले. तो हसत हसत सायकल चालवत होता. मी त्याच्या मागे धावत होते. मी त्याला पकडलं आणि सायकलवरून खाली पाडलं. मी त्याला खूप मारले.’ असं अभिनेत्री पुढे म्हणाली.
Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra : लॉर्ड शार्दुल ठाकूरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ, क्रिकेटरनं केलं समीर चौघुलेंचं कौतुक
समीराने सांगितलं की, त्यावेळी तिला प्रचंड राग आलेला. तिच्या बहिणी टॉप मॉडेल होत्या आणि ती खूप जाड होती. समीराला तिच्या वजनाची काळजी होती. अभिनेत्रीनं सांगितलं की, एके काळी तिला तिच्या शरीराचा तिरस्कार वाटायचा. ती ३०-३५ वर्षांची झाल्यावर तिची इन्सीक्यूरिटी कमी झाली आहे. लोकांनी आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना स्त्रियांशी कसं वागावं हे समजावून सांगितलं पाहिजे, असंही समीरानं शेवटी सांगितलं. ‘हॉटरफ्लायर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये समीरा रेड्डी बोलत होती.
Maharashtra TimesUjjwal Nikam : ‘अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा त्यांच्या मृत्यूचं कारण’, गुलशन कुमार मृत्यूप्रकरणी काय म्हणाले उज्ज्वल निकम?
दरम्यान, समीरा रेड्डीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती शेवटची ‘आखिरी सवाल’ या सिनेमात दिसलेली. त्यात तिनं पल्लवी मेननची भूमिका साकारली होती. हिंदी व्यतिरिक्त, ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही दिसली आहे.