Raigad Accident Police Officer Dies : कर्जत-मुरबाड महामार्गावरील कळंब-चाहूचीवाडी परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
इकोकार अपघात पोलिसाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमूलकुमार जैन, रायगड : कर्जत-मुरबाड महामार्गावरील कळंब-चाहूचीवाडी परिसरात बुधवारी (१५ जुलै) रात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जवान ऋतिक किसन ढोले (वय २६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नुकतीच संसाराची नवी सुरुवात केलेल्या ऋतिक यांच्यावर नियतीने असा घाला घातला की त्यांच्या गरोदर पत्नीवर आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनुकंपा तत्त्वावर मिळालेली नोकरी, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने आणि संसाराची सुरुवात हे सर्व एका क्षणात संपुष्टात आले.
ऋतिक ढोले यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला होता. कमी कालावधीत त्यांनी कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि मनमिळावू कर्मचारी म्हणून सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या ते श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नुकताच त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांच्या पत्नी गरोदर असल्यानं घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू होती. मात्र, नियतीने वेगळाच निर्णय घेतल्याने आनंदाचे वातावरण एका क्षणात शोकात बदलले. या दुर्घटनेने पोलीस दलासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऋतिक यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. या भीषण अपघाताचा पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा