बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटावर त्यांच्याच कुटुंबीयांनी आणि सांस्कृतिक क्षेत्रातून गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.

Amruta Raorane : MPSC आणि UPSC ची तयारी सुरू केली, पण एका मालिकेनं सगळंच बदललं; मराठी मालिकेतील अभिनेत्रीचा खुलासा
‘विठाबाई नारायणगावकर यांनी महाराष्ट्राच्या लोककलांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. मात्र, त्यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती करताना दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी संपूर्ण कुटुंबीयांची परवानगी घेतलेली नाही. चित्रपटाच्या टीझरमध्ये ‘भाऊ गावकर तमाशा मंडळ’ असा चुकीचा उल्लेख करण्यात आला असून, प्रत्यक्षात त्याचे नाव ‘भाऊ बापू (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ’ असे होते. बापूसाहेब खुडे नारायणगावकर यांना १९६१मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये हा प्रसंगही वस्तुस्थितीशी विसंगत आहे.
Zee Marathi serial: ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये अनुष्का पिंपुटकरची एन्ट्री, म्हणाली ‘मेघनसोबतही आता जास्त वेळ घालवता येतोय’
‘चित्रपटाचे नावही बदलण्याची आवश्यकता आहे. लोककलेच्या परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि तमाशा या लोककलेबाबत गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी चित्रपटात आवश्यक बदल करावेत; अन्यथा चित्रपट निर्माते व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई व आंदोलन करण्यात येईल,’ असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी विठाबाई नारायणगावकर यांचे नातेवाईक व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कायदेशीर कारवाईचा इशारा
विठाबाईंच्या संघर्षाची आणि लोककलेची चुकीची माहिती लोकांसमोर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. जर चित्रपट निर्मात्यांनी योग्य ते बदल केले नाहीत, तर आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि अब्रूनुकसानीचा दावा ठोकू, असा थेट इशारा विठाबाईंच्या नातवांनी दिला आहे. तसेच राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.
हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, वाढत्या विरोधामुळे आता निर्माते यावर काय पाऊल उचलतात आणि शीर्षकात बदल करतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?
मराठी मातीतली अस्सल लोककला ‘तमाशा’ आणि ‘लावणी’ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या महान कलावंत म्हणजे विठाबाई नारायणगावकर.विठाबाईंचा जन्म १ जुलै १९३५ रोजी पंढरपूर येथील एका प्रसिद्ध कलावंत कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा नारायण खुडे यांनी पारंपरिक तमाशा फड सुरू केला होता. पुढे त्यांचे वडील भाऊ आणि काका बापू यांनी ‘भाऊ-बापू मांग नारायणगावकर’ या नावाने हा फड चालवला. घरातच ढोलकीचा ताल आणि लावणीचे सूर असल्याने विठाबाईंच्या अंगात उपजतच कला होती. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी अत्यंत लहान वयात त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले आणि अल्पावधीतच आपल्या नृत्याने व आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली.

