Spider Man Swings Through Mumbai in Viral AI Video Ahead of Brand New Day Release | मुंबई लोकल स्पायडरमॅनच्या जाळ्यात अडकली, CSMT रेल्वे स्टेशनवरील AI व्हिडीओ व्हायरल, पाहून व्हाल अचंबित
Spider Man Swings Through Mumbai in Viral AI Video Ahead of Brand New Day Release | मुंबई लोकल स्पायडरमॅनच्या जाळ्यात अडकली, CSMT रेल्वे स्टेशनवरील AI व्हिडीओ व्हायरल, पाहून व्हाल अचंबित
Spider Man Video: स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डेच्या प्रमोशनसाठी AI च्या मदतीने तयार करण्यात आलेला एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनने मुंबई लोकल, बस, टॅक्सी आणि मेट्रो आपल्या जाळ्याच्या मदतीने हवेत लटकवल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.
(फोटो सौजन्य – mayankesh_vfx/Instagram)
स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जर तुम्ही सुपरहिरोंचे चाहते असाल, तर या चित्रपटाचा ट्रेलर, कलाकारांच्या मुलाखती, पडद्यामागच्या गंमती-जंमती अशा विविध माध्यमातून चित्रपटाबाबत सुरू असलेली चर्चा तुमच्याही कानावर आलीच असेल. पण याच पार्श्वभूमीवर एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
खरं तर हा व्हिडीओ AI जनरेटेड आहे. मात्र, व्हिडीओमध्ये दाखवलेली कल्पना प्रत्यक्षात घडली असती, तर संपूर्ण जगाने आश्चर्यचकित होऊन ती पाहिली असती. या व्हिडीओमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर स्पायडरमॅनने केलेली कमाल पाहायला मिळते. कुठे मुंबई लोकल स्पायडरमॅनच्या जाळ्यात हवेत लटकलेली दिसते, तर कुठे टॅक्सी आणि बस हवेत तरंगताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हीही अवाक् व्हाल.
कसा तयार केला असेल हा व्हिडीओ?
हा व्हिडीओ mayankesh_vfx या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. वास्तविक हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला असून, स्पायडरमॅन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास बनवण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ इतका वास्तवदर्शी तयार करण्यात आला आहे की, खरंच अशी घटना घडल्याचा भास होतो.
CSMT रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन छताला बांधून ठेवल्यासारखी दिसते. लोकांची वर्दळ, रस्त्यावरील वाहने आणि मुंबईतील इमारती… सगळंच अगदी खरं वाटतं. त्यामुळे हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. लाखो वेळा पाहिल्या गेलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी टाळ्या वाजवत या कल्पनेचं कौतुक करत आहे, तर कोणी स्पायडरमॅन मुंबईत कधी येणार, याची वाट पाहत आहे. असो, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.
स्पायडरमॅन सर्वात आधी भारतात प्रदर्शित होणार
स्पायडरमॅन हा मुळात हॉलिवूड चित्रपट आहे. पण गंमत म्हणजे, तो सर्वात आधी म्हणजे ३० जुलै रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे ३१ जुलैला, तो अमेरिकेत प्रदर्शित होईल. या चित्रपटात अभिनेता टॉम हॉलंड स्पायडरमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात सुपरहिरो हल्क देखील अॅक्शन करताना दिसणार असल्यामुळे चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे.
टॉम हॉलंडचा स्पायडरमॅनच्या भूमिकेतील हा चौथा चित्रपट आहे. यापूर्वी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पायडरमॅन: नो वे होममध्ये एकाच वेळी तीन स्पायडरमॅन पाहायला मिळाले होते. त्यामुळे तसाच काहीसा थरार या चित्रपटातही पाहायला मिळणार का, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा