Headlines

Renowned doctor mehul rathod found in suspicious circumstances in latur shocking truth revealed after autopsy; इनोव्हा कारमध्ये संशयास्पद स्थितीत आढळली प्रसिद्ध डॉक्टरची बॉडी; नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती


Latur News: या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

latur doctor death
इनोव्हा कारमध्ये संशयास्पद स्थितीत आढळली प्रसिद्ध डॉक्टरची बॉडी; नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर: लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांनी काल स्वतःच्या कारमध्ये भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे लातूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, विविध तर्क-वितर्कही लावले जात आहेत. राठोड यांना काल उपचारासाठी लातूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

याबाबत लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी सांगितलं की, “प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत नाही. हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांनी स्वतःला भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होईल. कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यांच्या मोबाईलमधील डेटा तपासला जात असून, काही ठोस पुरावे हाती लागल्यानंतरच संपूर्ण बाब स्पष्ट होईल.”

मेहुल राठोड यांचं एम जे रुग्णालय हे लातूर– बार्शी रोड या ठिकाणी असून ते काल दुपारी स्वतःची इनोव्हा गाडी घेऊन आंबेजोगाई रोड भागात आले. या ठिकाणी गाडीतच त्यांनी गुंगीच्या औषधाची इंजेक्शन घेतले आणि आत्महत्या केल्याचं आढळून आलं आहे. त्यांच्या इनोव्हा गाडीमध्ये इंजेक्शन आणि काही औषधांच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. काल दुपारी दीड वाजल्यापासून या भागात ही गाडी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

कुटुंबियांनी संपर्क केला, पण…

मेहुल राठोड यांच्या कुटुंबाकडून आणि दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना दुपारपासून फोन लावला जात होता. मात्र बराच वेळ ते फोन उचलत नसल्यामुळे शोधाशोध सुरू करण्यात आली. संध्याकाळच्या सुमारास राठोड यांची गाडी आंबेजोगाई रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नीने आणि इतर काही सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीमध्ये बेशुद्धावस्थेत असलेल्या डॉक्टरांची अवस्था लक्षात आल्यानंतर तात्काळ खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा