Mumbai Indians Meeting in England : आयपीएल २०२७ साठी मुंबई इंडियन्स आता तयारीला लागल्याचं दिसत आहे. इंग्लंडमध्ये बैठक पार पडणार असून आता यामध्ये मोठे निर्णय घेतले जातील. ऑपरेशन रिसेट होण्याची शक्यता असून नवीन कॅप्टन आणि कोचही ठरू शकतात. सविस्तर जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या दोन हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर संघातील टॉप मॅनेजमेंट आणि मालकांची बैठक इंग्लंडमध्ये होणार आहे. या बैठकीत गेल्या हंगामाचा संपूर्ण आढावा घेतला जाणार असून संघाला पुन्हा सुवर्ण दिवसांकडे नेण्यासाठी मोठे निर्णय घेतले जातील. हेड कोच माहेला जयवर्धने यांचा पोस्ट-सीझन रिपोर्ट या बैठकीतील मुख्य मुद्दा असणार आहे. जयवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली MI ने २०२५मध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानले होते, तर 2026 मध्ये थेट नवव्या स्थानावर घसरण झाली. त्यामुळे त्यांच्या भविष्याबद्दल साशंकता आहे. ड्रेसिंग रूममधील वाद आणि मैदानावरील खराब कामगिरीमुळे फ्रँचायझी आता ‘ऑपरेशन रिसेट’च्या मूडमध्ये आहे.
बैठकीतील दुसरा मोठा मुद्दा म्हणजे खेळाडूंची ट्रेड. सध्या हार्दिक पंड्याच्या ट्रेडबाबत सर्वाधिक चर्चा आहे. हार्दिकला संघात घेण्यासाठी अनेक फ्रँचायझी इच्छुक आहेत आणि MI ची भूमिका काय असेल यावरच पुढील चित्र अवलंबून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिक व्यतिरिक्त आणखी एका माजी भारतीय कर्णधारासाठीही इतर संघांनी रस दाखवला आहे. त्यामुळे ही ट्रेड फक्त एका खेळाडूपुरती मर्यादित राहणार नाही. मागील हंगामात कर्णधारपदावरून निर्माण झालेला गोंधळ आणि त्याचे संघाच्या कामगिरीवर झालेले परिणाम लक्षात घेता, व्यवस्थापन यावेळी ट्रेडबाबत अतिशय विचारपूर्वक निर्णय घेण्याची शक्यता आहे. IND vs ENG : ना अक्षर पटेल, ना शुभमन; इंग्लंडच्या पराभवासाठी भारताचे तीन खेळाडू जबाबदार, इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक काय म्हणाला? २०२७च्या हंगामासाठी कर्णधाराची निवड हा बैठकीतील सर्वात कठीण आणि निर्णायक मुद्दा असेल. MI हा संघ तात्पुरत्या व्यवस्थेवर कधीच विश्वास ठेवत नाही, त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षांसाठी कोण नेतृत्व करेल याचा दीर्घकालीन विचार केला जाणार आहे. यासाठी जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या दोन नावांची चर्चा जोरात आहे. बुमराह हा संघाचा सर्वात अनुभवी आणि महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने गेल्या तीन हंगामात जवळपास सर्व सामने खेळले आहेत. त्याने भारताचे टेस्ट संघाचे नेतृत्वही केले आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये विजय मिळवून दिला आहे. शिवाय २०२४ च्या मेगा लिलावापूर्वी त्याला सर्वाधिक मोबदल्यात रिटेन करण्यात आले होते.दुसरीकडे तिलक वर्मा हा तरुण आणि आक्रमक फलंदाज आहे. तो भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या रांगेतही आहे. मात्र त्याची टी-२० मधील फलंदाजी अजून सातत्यपूर्ण नाही आणि त्याच्यावर आत्ताच कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यास त्याच्या खेळावर परिणाम होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. Shubman Gill : अरे नावातच ताकद ! रोहित-विराट फेल पण कॅप्टन गिलचा डोळे झाकून विश्वास, मॅच संपल्यावर काय म्हणाला? IPL २०२६ मध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्यकुमार अनुपस्थित असताना बुमराहने कर्णधारपद सांभाळले होते. त्यावेळी त्याने “MI चा कर्णधार होण्याआधी मी भारताचा टेस्ट कर्णधार होईन असे वाटले नव्हते” असे विधान केले होते. एकूणच, कोचिंग, ट्रेड आणि कर्णधारपद या तीनही आघाड्यांवर होणारे निर्णय मुंबई इंडियन्सचे पुढील भविष्य ठरवणार आहेत.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा