अभिनेता सौरभ चौगुले यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट शहर करून त्याच्या मनातली खदखद व्यक्त केली.
Tharala Tar Mag : अनाथांची नाथ होणार सायली, पण प्रिया खेळणार डबल गेम; आश्रमाआड मुलींचा सौदा! सचिनचा क्रूर प्लॅन
तो म्हणाला की, एक घटना घडते आणि त्यामध्ये निष्पाप मुलांचा जीव जातो. त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. तसंच जेव्हा एका ट्रेनमध्ये एखाद्यावर सर्वांसमोर चाकू खुपसला जातो किंवा भर रस्त्यात एका मुलीवर तिने नकार दिला म्हणून तिच्यावर हल्ला करण्यात येतो तेव्हा प्रत्येक जण हेच सांगतो की इथे बघणार्यांपैकी कोणीतरी एक जण पुढे येऊन रेकॉर्ड करण्यापेक्षा तिला वाचवू शकलं असतं, किंवा त्याला वाचवू शकलो असत…
आजही तेच आहे. आपल्यासाठी एक व्यक्ती तिथे उपोषणाला बसली आहे. त्या व्यक्तीचा जीव आपण वाचवू शकतो पण आपण काहीच करत नाही. सिम्पल गोष्ट आहे ती म्हणजे एक चुकीची गोष्ट घडते त्या घटनेचे कोणीतरी जबाबदारी घ्यावी किंवा स्पष्टीकरण द्यावं हे कोणीच करत नाही. कोणी बोलतही नाही… आपण भक्त अंधभक्त याकडे नको जाऊ या. वरच्या लेव्हलचे जे राजकारण आहे तिथे त्या राजकारणात प्रत्येक मंत्री या पक्षातून त्या पक्षात जातो किंवा त्या पक्षातून या पक्षात येतो. हे सगळं घडत असतं पण जेव्हा तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून हे बघता…
Dhamaal 4 Box Office : धमाल 4 च्या कमाईत घट पण बॉक्स ऑफिसवर पकड कायम; सहाव्या दिवशी एकूण किती कमावले माहितीये?
तुम्हाला हे माहित असतं की चुकीचं घडतंय तरी तुम्ही त्या पक्षाशी त्या माणसाशी एकानिष्ठ आहात. जर तुम्हाला कळतंय की काहीतरी चुकीचं घडतंय तर स्वतःशी एकनिष्ठ राहा ना. कारण आता जर आपण काही बोललो नाही किंवा स्टॅन्ड घेतला नाही तर पुढे जाऊन कोणीही सोनम वांगचुक येऊन आपल्यासाठी स्टॅन्ड घेणार नाही. प्रत्येक जण हाच विचार करेल की अरे बघितलंस ना त्याचं काय झालं मग जाऊदे होईल सगळं नीट… ती वेळ येऊ देऊ नका जेव्हा आपल्याला स्वतःला वाटेल की आपण काहीतरी करू शकलो असतो…
मराठी सिनेइंडस्ट्रीमधून आतापर्यंत अनेक कलाकारांनी सोनम वांगचुक यांच्यासाठी आवाज उठवला आहे.

