Apurva Nemlekar On Past – अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता तिचा सुखी संसार अनुभवत आहे. पण मध्यंतरीचा काळ तिच्यासाठी खूप खडतर होता. एका मुलाखतीत तिने याबद्दल तिच्या भावना व्यक्त केलेल्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तिच्या प्रत्येक मालिका, प्रत्येक रोल हे प्रेक्षकांना भावतात. त्यामुळेच तिचा फॅन वर्ग पण मोठा आहे. या सर्व आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालू आहे ते जाणून घेण्यात नेहमीच इंटरेस्ट असतो. काही महिन्यांपूर्वी अपूर्वाने दुसरे लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तिने 14 फेब्रुवारी रोजी तनुज गोवलकर सोबत लग्न गाठ बांधली.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचे खरंतर हे दुसरे लग्न आहे. पहिल्या लग्नात भरपूर काही सहन केल्यानंतर तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खचून न जाता पुन्हा आपल्या कामात रुजू झाली आणि स्वतःला सिद्ध केले. या सर्व प्रकरणात काही माणसांमुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागला होता पण त्यांच्यामुळेच आपण आता खंबीर झाले असेही ते म्हणाली. Sonali Pandit : हिंदी मालिकेचा इतका वैताग की स्वत:च पात्र मारुन टाकलं पाहिजे अशी मनोमन इच्छा, मोहिनी फेम अभिनेत्रीने सांगितला किस्सा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिले होते ज्यामध्ये तिच्या मनातल्या यातना आणि त्यावर केलेली मात याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, काही जगाच्या मित्रमंडळींनी ज्यांना खरी परिस्थिती माहीत असूनही माझ्यासमोर खोटे चित्र उभे केले आणि फसवणूक काय असते याची चव दिली त्यांना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.
Priyanka Chopra : एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींशी संबंध आहेत, दीरांसोबत गप्पागोष्टी करताना प्रियांका चोप्राने सांगितला किस्सा दहा वर्ष अफेअर होतं माझं, त्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं मग आम्ही लग्न केलं होतं. हे काही छोटी गोष्ट नाही. त्यानंतर आमचा घटस्फोट झाला. पुढे आठ वर्ष मी सिंगल होते. लोकांना वाटायचं की शेवंता कशी काय सिंगल असू शकते… पण होते! मी खूप वेळ घेतला माझ्यासाठी, पळवाट शोधली नाही. त्यामुळे मी अशा लोकांचे आभार मानते की त्यांनी मला त्या परिस्थितीमध्ये टाकलं जिथे माझ्याकडे सक्सेसफुल होण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने हे म्हटले होते.
अपूर्वा नेमळेकरच्या दुसऱ्या लग्नाबाबत बोलायचे झाल्यास, मी एक गोष्ट खात्रीपूर्वक ठरवलेली की मला माझ्या फिल्ड मधला नवरा नको आहे. कारण ज्या पद्धतीने आपण काम करतो त्याला वेळ, दिवस, सणवार काहीही मिळत नाही. किती वर्ष काम केल्यानंतर मला थोडीफार स्टेबल लाईफ हवी होती म्हणूनच मला इंडस्ट्री मधला नवरा नको होता. मग मी मेट्रोमोनी साईडवर रितसर नाव नोंदवलं आणि स्थळ पाहत होते. मी काहींना भेटले पण… मात्र माझं काही त्यांच्याशी जमलं नाही. त्यानंतर माझ्या भाचीने सहज तनुजला रिक्वेस्ट पाठवली आणि त्याच्याकडून ती एक्सेप्ट झाली. मग आम्ही भेटलो आणि मग लग्न झालं.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा