Longest Serving Chief Minister Of Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकूण २ हजार ४३० दिवस पूर्ण केल्याने सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्यांच्या यादीत ते आता तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत फडणवीस या क्रमांकावर पोहोचले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे आणि २२१ दिवसांचे म्हणजेच एकूण २ हजार ४१२ दिवसांचे कामकाज हाताळले होते. १२ जुलै रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकूण सहा वर्षे सात महिन्यांचा कालावधी पूर्ण केला आहे. हा कालावधी एकूण २ हजार ४३० दिवसांचा होतो. या निमित्ताने रवींद्र चव्हाण यांनी फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. Maratha Reservation: ‘एसटी’ व्यक्तीही राष्ट्रपतिपदी; ‘मराठा आरक्षण’प्रश्नी सरकारचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद वसंतराव आणि विलासराव पुढे फडणवीस यांनी यापूर्वीच वसंतदादा पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मनोहर जोशी, शंकरराव चव्हाण यांना मागे टाकले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा २ हजार ६८६ दिवसांचा तर वसंतराव नाईक यांचा ४ हजार ९६ दिवसांचा कार्यकाळ राहिला आहे. भविष्यात फडणवीस यांनी देशमुख यांचा हा कार्यकाळ मागे टाकल्यास ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.
मुख्यमंत्र्यांचा १२ जुलैपर्यंतचा कार्यकाळ पहिला – ३१ ऑक्टोबर २०१४ – १२ नोव्हेंबर २०१९ = १,८३९ दिवस दुसरा – २३ नोव्हेंबर २०१९ – २८ नोव्हेंबर २०१९ = ६ दिवस. तिसरा – ५ डिसेंबर २०२४ – १२ जुलै २०२६ = ५८५ दिवस.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा