Headlines

‘पंढरीची वारी’ चित्रपटाचा मुहूर्त, शूटिंगची तयारीही झाली, अन् अरुण सरनाईक यांच्या अपघाती निधनाचा फोन, डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग


मराठी सण उत्सव आणि सिनेमे…यांचं एक वेगळंच समिकरणच आहे. प्रत्येक सणाच्या दिवशी एखादा ठराविक सिनेमा टीव्हीवर हमखास लागतोच, अन् प्रेक्षकही तो सिनेमा आवडीनं पाहतात. असाच एक सिनेमा म्हणजे पंढरीची वारी. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत, जे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता प्रेक्षकांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनतात.

दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा ‘पंढरीची वारी’ (१९८८) हा चित्रपट याच पठडीतील एक अजरामर कलाकृती म्हणावी लागेल. दरवर्षी आषाढी एकादशी आली की, टीव्हीवर लागणारा हा चित्रपट आणि त्यातील भक्तीरस आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. निर्माते दिवंगत आण्णासाहेब घाटगे यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. पण यासिनेमाच्या निर्मितीची देखील एक लांबलचक अशी एक कथाच आहे. अनेक अडथळे पार करत , न खचता आण्णासाहेब घाटगे यांनी हा सिनेमा पूर्ण केलाय.

वारीची अनुभूती, वारकऱ्यांची विठ्ठलाप्रती असलेली अथांग श्रद्धा आणि वारीच्या वाटेवर घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींना रुपेरी पडद्यावर हुबेहूब जिवंत करणारा चित्रपट म्हणजे ‘पंढरीची वारी’. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही, म्हणजेच २०२६ मध्येही तसूभरही कमी झालेली नाहीए. आजही सिनेमा आवडीनं पाहिला जातो. आषाढी वारी जवळ आली की सिनेमाची चर्चा ठरलेली आहे.

४ वर्षे रखडलं होतं शूटिंग

एका भीषण कार अपघातात अरुण सरनाईक यांचं दुर्दैवी निधन झालं, तर अभिनेत्री रंजना यांना कायमचे अपंगत्व आलं.या मोठ्या संकटामुळं आणि सुमारे १८ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीमुळं चित्रपटाचे काम तब्बल ४ वर्षे रखडलं होतं.

आण्णासाहेब घाटगे यांचे चिरंजीव निशांत घाटगे यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अरुण सरनाईक यांच्या निधनाचा भावुक असा प्रसंग शेअर केला आहे.

२१ जून १९८४ रोजी माझे बाबा म्हणजे आमचे अण्णा निर्माते कै.आण्णासाहेब घाटगे यांच्या म्हणजे आमच्या”पंढरीची वारी” या चित्रपटाचा मुहूर्त होता. सगळे आपपल्या कामात व्यस्त. आळंदी मध्ये चित्रपटाच्या शूटिंगची सगळी तयारी झाली होती. सगळे तंत्रज्ञ पुढे गेले होते. सगळे कलाकर एकत्र निघायचे ठरलं होतं.आम्ही अरुण सरनाईक यांची वाट पहात होतो.तेवढ्यात ज्या हॉटेलमध्ये आम्ही रहात होतो तिथे काउंटरला माझ्या बाबांसाठी कॉल आला होता. मी पण त्यांच्यासोबत बाहेर आलो होतो. फोनवर काहीतरी माझ्या बाबांनी ऐकलं त्यांच्या हातून रिसिव्हर खाली पडला.माझे बाबा एकदम खाली बसले.त्यांच्या अंगाला घाम सुटला होता. मला काहीच सुधरत नव्हतं.मी जोरात ओरडत हॉल मध्ये गेलो सगळे धावत माझ्या बाबांजवळ आले…मग माझ्या बाबांनी सांगितल की अरुणजी अपघातामध्ये गेले. असा हा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग निशांत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलाय.

Maharashtra TimesMurali Sharma: इंडस्ट्रीतल्या लोकांनीच टोमणे मारले, महेश भट्ट यांच्याकडे केलं मन मोकळं, अभिनेते मुरली शर्मा यांना वाटलेली भीती

अरुण सरनाईक यांच्या निधनानंतरही अनेक अडचणी आल्या.अखेर आण्णासाहेब घाटगे आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांनी धीर न सोडता मुख्य भूमिकेसाठी बाळ धुरी आणि जयश्री गडकर यांना घेऊन हा चित्रपट पूर्ण केला. पुणे ते पंढरपूर या प्रत्यक्ष पालखी मार्गावर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आल होतं. एका साध्या ग्रामीण वारकऱ्याचा वारीतील प्रवास, त्याचा कौटुंबिक संघर्ष आणि विठ्ठलावरील भक्तीचे अतिशय भावस्पर्शी चित्रण यात पाहायला मिळतं.

Maharashtra TimesAmin Hajee : ‘मी त्याला रडताना पाहिलंय, घटस्फोटासाठी केवळ एका व्यक्तीला दोष देणं चुकीचं’, आमिर खानबद्दल लोकप्रिय अभिनेत्याचं वक्तव्य
बाळ धुरी आणि जयश्री गडकर
विठ्ठलभक्त अण्णा आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत या दोघांनी जीव ओतला होता.अशोक सराफ, राजा गोसावी आणि राघवेंद्र काडकोळ यांच्या भूमिकाही विशेष गाजली. वारीमध्ये चोरीच्या उद्देशाने सामील झालेल्या तीन चोरांची (सदा, नाना आणि गणा) भूमिका या त्रिकुटानं साकारली होती. त्यांच्या विनोदी आणि नंतर बदलणाऱ्या स्वभावानं चित्रपटाला एक वेगळी उंची दिली.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत