Headlines

Raigad Pen Five Year Old Girl Kidnapped and Killed; दोन दिवसांपासून चिमुकली बेपत्ता, 100 मीटर अंतरावर धक्कादायक दृश्य; आई-वडिलांची पायाखालच्या जमीन सरकली


Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

Raigad Crime News
पेण मुलीचं अपहरण करुन हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडी येथे पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पेण तालुक्यात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी एका २४ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

लेक रात्रीपासून बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, पेण पोलीस ठाण्याला मंगळवारी (१४ जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास पाटणेश्वर आदिवासी वाडी येथील पाच वर्षीय मुलगी ही सोमवार (१३ जुलै) रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच पेण पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिसांच्या विशेष शोध पथकासह श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. परिसरातील शेत, झाडी आणि आसपासच्या भागात कसून शोध घेण्यात आला.
Maharashtra TimesPankaja Munde: घोषणा झाली की लगेच खात्यात पैसे कसे येणार? ही सरकारी प्रक्रिया आहे! कर्जमाफीवरून पंकजा मुंडेंनी विरोधकांना सुनावले
शोधमोहीमेदरम्यान घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील शेत परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने परिसराचा ताबा घेऊन पंचनामा केला आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरविली. घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल तसेच पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

पोलीस पुढील तपास करत आहेत

तपासादरम्यान पोलिसांनी किरण भिकू वाघमारे (वय २४) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यामागील नेमके कारण, तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Maharashtra TimesSupreme Court : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी केवळ दोन अपत्यांची अट बेकार, बुलढाण्याच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी
दरम्यान, मृत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पेण तालुका हादरला असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून पुढील तपास पेण पोलीस करीत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा