Pune Moshi Garbage Depot Accident 25 Days old infant lost Father after Building Collapsed; लग्नाच्या दहा वर्षांनी पाळणा हलला, पण मोशी दुर्घटनेत 25 दिवसांच्या बाळाचं पितृछत्र हरपलं; लेकराने कष्टाळू वडील गमावले
Pune Moshi Garbage Depot Accident 25 Days old infant lost Father after Building Collapsed; लग्नाच्या दहा वर्षांनी पाळणा हलला, पण मोशी दुर्घटनेत 25 दिवसांच्या बाळाचं पितृछत्र हरपलं; लेकराने कष्टाळू वडील गमावले
Pune Moshi Accident : कष्टाच्या कमाईवर संसाराचा गाडा ओढणारे कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा क्षणात मोडला आहे. लग्नानंतर दहा वर्षांनी त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला असताना सुनील कोरकेंच्या निधनाने पितृछत्र हरपले आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : मोशी कचरा डेपो दुर्घटनेने केवळ नऊ कामगारांचे जीव घेतले नाहीत, तर नऊ कुटुंबांचा आधार, स्वप्ने आणि उद्याची आशाही हिरावून नेली आहे. कुणाच्या चिमुकल्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, कुणाचा नव्याने फुललेला संसार अर्ध्यावर तुटला, तर कुणाच्या वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार कायमचा निघून गेला. कष्टाच्या कमाईवर संसाराचा गाडा ओढणारे हे कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा क्षणात मोडला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सनी अशोक माने (वय ३६) यांचा कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. मोशीतील शास्त्रीनगर येथे वास्तव्यास असलेले सनी तीन वर्षांपासून ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पात वाहन चालक होते. घटनेच्या दिवशी घरी बिर्याणीचा बेत होता. मात्र, सहकाऱ्यासोबत जेवण्यासाठी ते कार्यालयातच थांबले आणि काही क्षणांतच इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला. पत्नी कांचन, सात वर्षांचा ईशान आणि दोन वर्षांचा विहान असा त्यांचा परिवार आहे. कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण द्यावे, हे त्यांचे स्वप्न होते. आता घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
संजय गांधीनगर, मोशी येथील रहिवासी असलेले नागेश सर्जेराव गायकवाड (वय २९) तीन वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. दुर्घटनेच्या वेळी प्रशासकीय इमारतीत असताना कचऱ्याचा ढिगारा कोसळला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पत्नी सोनाली, चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया या दोन मुली, आई-वडील आणि मोठा भाऊ स्वप्नील असा त्यांचा परिवार आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी नोकरी स्वीकारली होती. स्वतःचे घर उभे करणे आणि मुलींना शिकवणे हे त्यांचे ध्येय होते. मात्र, एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा