Headlines

Pune Moshi Building Collapse Garbage Depot Accident Sunil Korke Death Emotional Story 8 People Dead; ‘पुढच्या वर्षी नक्की वारी करेल’; पण नियतीने आयुष्याला पूर्णविराम दिला, मोशी दुर्घटनेत अवघ्या 25 दिवसांच्या लेकराचं पितृछत्र हरपलं


Pune Moshi Building Collapse : ‘यंदा कामाचा खूप व्याप आहे. वारी यंदा राहू दे, पुढच्या वर्षी विठूरायाच्या चरणी नक्की जाईन,’ असा विचार मनाशी पक्का करून 34 वर्षीय सुनील कोरके बुधवारी कामावर गेले होते.

Pune Moshi Building Collapse
मोशी दुर्घटना सुनील कोरके मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : ‘यावेळ खूप काम आहे. यावर्षी वारी राहू दे, पुढच्या वर्षी विठूरायाच्या चरणी नक्की जाईन,’ असा विचार करून 34 वर्षीय सुनील कोरके बुधवारी 8 जुलै रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेले. मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कॅन्टीनमध्ये बसून जेवायला सुरुवात करण्याआधीच मोशी येथील कचरा डेपो परिसरातील इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि या भीषण दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात कोरके कुटुंबाचा आनंदी संसार उद्ध्वस्त झाला.

25 दिवसांच्या लेकराचं पितृछत्र हरपलं

मूळचे पंढरपूर येथील असलेले सुनील कोरके हे गेल्या 10 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड परिसरातील एका खासगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. प्रामाणिक आणि मेहनती अशी त्यांची ओळख होती. 10 वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात त्यांचा विवाह झाला आणि संसाराला सुरुवात झाली. अवघ्या 25 दिवसांपूर्वी त्यांच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला होता. घरात नव्या पाहुण्याच्या आगमनानं कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. आपल्या नवजात मुलाला कुशीत घेऊन त्याच्यासाठी अनेक स्वप्ने पाहणाऱ्या सुनील यांच्या आयुष्याला मात्र नियतीने थांबा दिला. पितृत्वाचा आनंद मनसोक्त अनुभवण्यापूर्वीच काळाने त्यांना आपल्या कवेत घेतलं.

‘पुढच्या वर्षी नक्की वारी करेल’

सुनील यांचे वडील गावाकडे शेती करतात, तर त्यांचा भाऊ अनिल कोरके वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी सांभाळतो. नोकरीनिमित्त शहरात राहत असूनही सुनील यांचे मन कायम पंढरपूर आणि विठ्ठल भक्तीत रमलेले असायचे. दरवर्षी माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करणाऱ्या सुनील यांना यंदा कामाच्या व्यापामुळे वारीला जाता आले नव्हते. ‘यंदा नाही, पुढच्या वर्षी नक्की वारी करेन,’ हा त्यांचा निर्धार आयुष्यातील शेवटचा ठरला. एका बाजूला पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांचा जल्लोष सुरू असताना, दुसऱ्या बाजूला त्याच पंढरपूरच्या एका वारकऱ्याची जीवनवारी मोशी दुर्घटनेत कायमची थांबली.

आठ कामगारांचा मृत्यू

मोशी येथील कचऱ्याच्या डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (आठ जुलै) मोशी कचरा डेपो येथे ही दुर्घटना घडल्यानंतर गुरुवारी (नऊ जुलै) पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (११ जुलै) सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कामगारांव्यतिरिक्त वामन कसबे नावाचा एक कामगार बचाव पथकाला सापडलेला नाही. तो आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी ढिगाऱ्याखाली अडकले आहे का, याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर कोसळून अँटनी लोरा या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कोसळली. यानंतर पोलिस, अग्निशमन दल, महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ‘एनडीआरएफ’ला पाचारण करण्यात आले. या इमारतीमध्ये एकूण २३ कामगार होते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा