Headlines

Thane serious allegations against vinayak raut family daughter in law files complaint; “दुबई, थायलंडसह जगभर फिरलो, पण माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत”; राऊतांच्या सुनेचे पतीवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यात तक्रार


ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं पोलीस ठाण्यात सासर्‍यासह एकूण 12 जणांविरोधात तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन भोंदू बाबांचाही समावेश आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून माझा मानसिक, शारीरिक, भावनिक छळ सुरू असून आपली फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पती व माझ्यात क्लेश होण्यात सासूचा मोठा सहभाग असल्याचं पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे. ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

राऊत यांच्या सुनेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “माझे पती, गितेश राऊत हे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास असक्षम असल्याचं सासरे विनायक राऊत, सासू शामल राऊत यांना माहीत असूनही त्यांनी गितेशचे माझ्यासोबत लग्न लावून दिलं. तसंच सासू शामल राऊत हिने मला घरातील जेवण, देवपूजा व इतर बाबींवरून मानसिक त्रास देऊन, मासिक पाळी पुढे करण्यासाठी सातत्याने गोळ्या घेण्यासाठी भरीस पाडून माझी तब्बेत बिघडवण्यास कारणीभूत झाल्या. तसंच वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करत असताना ते ईलाज नाकारून मला ‘होम इन्सेमिनेशन’ हा पर्याय करण्यावर दबाव टाकून मला खूप त्रास दिला आहे. असा माझा शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ करून, माझे आर्थिक खच्चीकरण करून आणि माझ्यावर अनेक अघोरी इलाज करून माझा अमानुष छळ केला आहे,” असा आरोप करत पीडितेने पती-गितेश राऊत, सासू व सासरे शामल राऊत व विनायक राऊत, तसेच लग्न जुळवणारे गितेश राऊत याची सख्खी आत्ते बहीण सुरेखा राजेश सरफरे आणि तिचे पती राजेश सरफरे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

“जगभर फिरलो, पण संबंध ठेवले नाहीत”

पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पीडितेने गंभीर आरोप केले आहेत. “लग्न झाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र, ऊटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, नॉर्वे, दुबई, केनिया, थायलंड अशा देशांत फिरायला गेलो असता तिथेही पतीने माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत. त्याबाबत विचारणा केल्यास मला सातत्याने शिवीगाळ करून मारहाण केली,,” असं तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी पोली अधिक तपास करत आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत