Headlines

देशाच्या ७०% भागावरून पावसाचे ढग गायब, राज्यात पुन्हा धो-धो पाऊस कधी कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज| Maharashtra Times


Maharashtra Weather: राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून पुन्हा तापमान वाढलं आहे. १२ जुलै रोजी राज्यात सर्वत्र हवामान कसं असेल ते जाणून घ्या.

मान्सून अपडेट १२ जुलै
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसला. पण त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असल्याचं दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊस मंदावला आहे. पुन्हा तापमान वाढू लागलं आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रातील नागरिक घामाघूम होत आहेत. महाराष्ट्रसह संपूर्ण देशात अशीच स्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांत दांडी मारली आहे.

प्रशांत महासागरात चक्रीवादळ

११ जुलै रोजी उपग्रहातील छायाचित्रांमध्ये देशातील सुमारे ७० ते ८०% परिसरात मान्सूनचे ढग गायब झालेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच संपूर्ण देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होणं चिंताजणक वाटू लागलं आहे. पण या प्रश्नाचं उत्तर पश्चिम प्रशांत महासागरामध्ये दडलेलं आहे. हिंदी महासागरातील आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे आणि महासागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात मोसमी पाऊस होतो आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला चालना मिळते. पण पश्चिम प्रशांत महासागरात सध्या एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होत आहे. या वादळामुळे हिंदी महासागरातील आर्द्रता आणि वाऱ्यांचा प्रवाह त्या दिशेने खेचला जात असून भारतापासून दूर जात आहे. यामुळे मान्सूनचा प्रवाह कमकुवत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra TimesMaharashtra Rain : ही वादळापूर्वीची शांतता, महाराष्ट्रात पुन्हा आक्राळविक्राळ पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमकुवत होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जुलै महिन्यात सरासरीच्या ९४ % टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम आणि पूर्व भारतात चांगला पाऊस झाला पण मध्य भारतातील राज्यांमध्ये अजूनही मान्सून कमकुवतचं आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये मान्सून पुन्हा मजबूत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकण विभागात १२ जुलै रोजी हवामान कसं असेल?

पालघर, ठाणे, मुंबई आणि कोकणात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता पावसाची तीव्रता कमी झाली आहे. रविवारी या भागांमध्ये हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमीच राहील.

उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश

रविवारी, १२ जुलै रोजी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसं असेल?

पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये आज पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. पण घाट माथ्याच्या क्षेत्रांमध्ये मध्यम मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. शिवाय सांगली आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे आज प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

Maharashtra TimesEl Nino वेगाने सक्रिय, कमी पावसाचा अंदाज असताना धो-धो बरसला; हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

मराठवाडा आणि विदर्भातील हवामान अंदाज

छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असून परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तर वातावरण कोरडे राहणार आहे. दरम्यान, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पावसाने विश्रांती घेतली असून हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा