Headlines

भारताने जिंकला टॉस, प्लेइंग 11 मध्ये 2 मोठे बदल; संजूची एन्ट्री अन् बेबी बॉसही बाहेर, जाणून घ्या


मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाचव्या आणि शेवट्याच्या t20 सामन्याला सुरुवात झाली आहे. कर्णधार श्रेयश अय्यर याने पुन्हा एकदा टॉस जिंकलाय. संपूर्ण मालिकेमध्ये श्रेयसने सर्व सामन्यांचे टॉस जिंकले परंतु एकदाही विजय मिळवता आला नाही. आजच्या सामन्यातही श्रेयसने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आजच्या सामन्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. बेबी बॉस म्हणजेच वैभव सूर्यवंशी आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांना आजच्या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. तर आज दोन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे ती म्हणजे, ज्याची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे संजू सॅमसन आणि सूर्य आज प्लेइंग 11मध्ये खेळणार आहेत.

या मालिकेमध्ये आज पहिल्यांदाच सूर्यांश शेडगे याला संधी मिळाली आहे. तर पहिला सामना जो पावसाने रद्द झाला त्या सामन्यात संजू खेळला होता, मात्र त्यानंतर त्याला अगदी माकडामध्ये संधी देण्यात आली नव्हती. वैभव सूर्यवंशीला त्याच्या जागी खेळवलं होतं. पण त्यालाही काही खास कामगिरी करता आले नाही शेवटी टीम मॅनेजमेंटने टीका व्हायला लागल्यावर संजूला खेळवण्याचा निर्णय शेवटी घेतलाच. आता या सामन्यात संजू कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra TimesIND W vs ENG W Test : ऐतिहासिक कसोटीत भारत पहिल्या दिवशी 285 वर ऑल आऊट; स्मृती, हरमनप्रीत आणि दीप्तीची अर्धशतके
श्रेयस अय्यर याने कर्णधारपदाची जबाबदारी घेतल्यापासून त्याला एकही सामना जिंकता आला नाही. मात्र त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून श्रेयसने सलग सात सामन्यात टॉस जिंकलाय. अशी कामगिरी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर होती. श्रेयस ने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडित काढला आहे.
Maharashtra TimesVirat Kohli : सकाळी 6 वाजताच मैदानावर पोहोचायचा किंग कोहली; 11 वर्षांनंतर कोचने उघड केलं कारण, इंग्लंड दौऱ्याशी आहे कनेक्शन
भारताने ही मालिका गमावली आहे, कारण पाच सामन्यांच्या मालिकेत सलग तीन सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. पहिला सामना पावसाने रद्द झाला होता मात्र त्यानंतर इंग्लंडने सर्व सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. आता भारतीय संघासमोर व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ आज इंग्लंडला किती धावांवर रोखतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra TimesIND vs ENG 5th T20 : भारत वि. इंग्लंड शेवटचा सामना, वैभव राडा घालणार, सूर्यकुमारची विकेट का पडली? पहिल्यांदा टीम मॅनेजमेंटकडून स्पष्टीकरण

भारत (प्लेइंग 11): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसिद्ध कृष्णा

इंग्लंड (प्लेइंग 11): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (WK), हॅरी ब्रूक (C), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत