Headlines

IAS Tukaram Mundhe Lead FDA Order to recall stock of drugs due to drug name confusion


तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने कॅडीला फार्मास्युटिकल्सच्या Aciloc 150 आणि Aciloc 300 औषधाच्या 2 कोटी 45 लाखांच्या साठ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. बाजारातील सर्व साठा परत घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Tukaram Mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या ‘सुरक्षित अन्न सुरक्षित औषधे आणि सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमे अंतर्गत राज्यभरात औषधे आणि सौंदर्य प्रसाधने संबंधित बेकायदेशीर प्रकरणांचा शोध घेऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाईदरम्यान अमरावती यथे नियमित तपासणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. मे. कॅडीला फार्मास्युटिकल्स लिमिटेड, अहमदाबाद या संस्थेस पूर्वीपासून Aciloc 150 आणि Aciloc 300 ही औषधे उत्पादन आणि विक्रीसाठी मंजूर आहे. त्या औषधामध्ये Ranitidine हे सक्रिय औषधी घटक (Active Pharmaceutical Ingredient) आहे. मात्र संस्थेने नव्याने बाजारात आणलेल्या Aciloc 150 + आणि Aciloc 300 + या औषधांमध्ये Ranitidine ऐवजी Famotidine हा पूर्णपणे वेगळा सक्रिय औषधी घटक वापरला आहे. या औषधाच्या ब्रँड नावात केवळ “+” (Plus) हे चिन्ह जोडून औषधाचे लेवलवरील इतर Artwork जवळपास समान ठेऊन ही औषधे बाजारात उपलब्ध करून दिली आहेत.

विशेष म्हणजे, Ranitidine असलेली जुनी औषधे आणि Famotidine असलेली नवीन Plus औषधे ही दोन्ही बाजारात एकाच वेळी उपलब्ध असल्याचे तपासात आढळून आले. औषधांच्या नावातील हे साम्य डॉक्टर, औषध विक्रेते तसेच रुग्ण यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून चुकीचे औषध वितरित होण्याची किंवा वापरले जाण्याची शक्यता निर्माण करू शकते. जेव्हा एखाद्या ब्रँड नावाने विक्री होणाऱ्या औषधातील मूळ औषध घटक किंवा संरचना बदलल्यास त्याच ब्रँड नावाने नवीन औषध घटक असलेले औषध विक्री वितरण करून नयेत, असे दिशानिर्देश आहेत.

कोट्यवधींचे औषध वितरण्यास बंदी

या कारवाई अनुषंगे उक्त कंपनीच्या राज्यातील पुणे, नागपूर व भिवंडी, ठाणे येथील मुख्य पुरवठा गोदम (CFA) येथे तात्काळ चौकशी करून 9 आणि 10 जुलै रोजी Aciloc 150+ व Aciloc 300+ या औषधचा उपलब्ध सर्व साठा 2 कोटी 45 लाख 37 हजार 490 रुपये विक्री वितरणासाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य सुरक्षीततेस सर्वोच्च प्राधान्य देत नावातील साम्य आणि त्यामुळे चुकीचे औषध रुग्णांपर्यंत पोहोचण्याची शक्यता विचारात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
Maharashtra TimesTukaram Mundhe : अधिकारी पलिकडचा माणूस! बापाचं हळवं मन, मुलाबद्दल व्यक्त केली खंत
संबंधित संस्थेस Aciloc 150, Aciloc 150 Plus आणि Aciloc 300 Aciloc 300 Plus या औषधांचा बाजारातील उपलब्ध साठा तात्काळ Recall (परत मागविण्याचे) करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० व त्याअंतर्गत नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रिया

या कारवाईवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “औषधाच्या नावामुळे रुग्ण, डॉक्टर किवा औषध विक्रेता यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊन चुकीचे औषध दिले जाण्याची शक्यता ही सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत गंभीर वाव आहे. औषधांचे ब्रँड नाव, लेवलिंग आणि विपणन करताना नियमांचे पालन व रुग्णांची सुरक्षितता सर्वोच्च मानली गेली पाहिजे. सुरक्षित औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो अवाधित ठेवणे ही आमची सर्वोच्च जवाबदारी आहे”, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली.

FDA कडे मोलाचं आवाहन

  • औषधाचे ब्रँड नाव आणि सक्रिय औषधी घटक (Active Ingredient) यांची खात्री करूनच औषधांचा वापर किंवा वितरण करावे.
  • नावात साधर्म्य असलेल्या औषधांच्या वावतीत विशेष दक्षता घ्यावी
  • औषधांच्या वापरावावत कोणताही संभ्रम असल्यास डॉक्टर किंवा औषधतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • संशयास्पद औषधांवावत अथवा औषधांच्या नावामुळे संभ्रम निर्माण होत असल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.
चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा