व्हिएतनामच्या फु क्वोक बेटाजवळ एक बोट उलटल्याने १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने सांगितले की, ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
या घटनेत मृत्यू पावलेल्यांमध्ये एकूण १५ भारतीय पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी एपी या वृत्तसंस्थेला दिली आहे. व्हिएतनामच्या फु क्वोकजवळील होन मे रुट न्गोई बेटाजवळ बोट उलटली, तेव्हा त्या बोटीत ३२ भारतीय पर्यटक आणि चार खलाशी होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांचा एकूण आकडा अद्याप निश्चित झालेला नाही.
घटनेचा नेमका तपशील स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळवला जात आहे, असे दूतावासाने सांगितले . दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे
“या दुःखद घटनेत, काही तासांपूर्वी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली आहे . घटनेचा नेमका तपशील मिळवला जात असून, स्थानिक प्रशासनाकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे,” असे व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने X वर पोस्ट केले. माहिती आणि मदत पुरवण्यासाठी हो चि मिन्ह शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासात आणि हनोई येथील दूतावासात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, असेही त्यात म्हटले आहे.
