Headlines

Palghar Devipada Flood Causes Difficulty in Cremation Family with Body Roof of House Four Hours; मुसळधार पावसामुळे आईचा अखेरचा निरोपही रोखला, बॉडीसह अख्खं कुटुंब चारतास घराच्या छतावर, महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; हृदयद्रावक Video


Palghar Rain News : पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे केळवे रोडच्या पूर्वेकडील देवीपाड्यात एका कुटुंबावर ओढवलेला प्रसंग मन सुन्न करणारा ठरला.

Palghar Rain News
मृतदेहासह चारतास घराच्या छतावर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, पालघर : पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, या नैसर्गिक संकटाचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. केळवे रोडच्या पूर्वेकडील देवीपाडा येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, पुराच्या पाण्यात एका कुटुंबाला मृतदेहासह तब्बल चार तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

देवीपाडा येथील अनुसया मनोहर लिलका (वय 55) यांच्यावर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचं निधन झालं. त्यानंतर सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला. मात्र, रेल्वे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. अखेर नातेवाईकांनी मोठ्या कष्टानं मृतदेह खांद्यावर घेऊन घरापर्यंत नेला.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यानं काही वेळातच परिसरात पुराचं पाणी वाढू लागलं. घरात पाणी शिरल्यानं परिस्थिती गंभीर बनली. पाण्याचा वेग आणि पातळी वाढत असल्यानं मृतदेह सुरक्षित ठेवण्याचं मोठं आव्हान कुटुंबासमोर उभं राहिलं. अखेर कुटुंबीयांनी धाडस करत स्वयंपाकघराच्या छतावरील दोन सिमेंट पत्रे बाजूला करून मृतदेह वरच्या छतावर नेला.
Maharashtra TimesSolapur Crime : दोन महिन्यांपूर्वीच साता जन्माच्या आणाभाका, याच जन्मात विरल्या, पत्नीचं अफेअर बघून पतीनं नको ते केलं; अख्खा संसार उद्ध्वस्त

कुटुंब अक्षरशः हादरून गेलं

यानंतर मृतदेहावर प्लास्टिक टाकून संरक्षण करण्यात आलं. घरातील लहान मुले, महिला आणि इतर सदस्यांसह संपूर्ण कुटुंबानं जवळपास चार तास छतावर बसून पुराचा सामना केला. एका बाजूला कुटुंबातील सदस्याच्या निधनाचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यांसमोर वाढणाऱ्या पुराच्या पाण्याची भीती, अशा दुहेरी संकटामुळे लिलका कुटुंबीय अक्षरशः हादरून गेलं.
Maharashtra Timesगायमुख घाटातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?
काही तासांनंतर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर मृतदेह खाली आणण्यात आला. गावकऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक व्यवस्था केली. त्यानंतर देवीपाडा स्मशानभूमीत अनुसया लिलका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनं पालघर जिल्ह्यातील पूरस्थितीची भीषणता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नैसर्गिक आपत्तीसमोर माणूस किती असहाय्य ठरतो, याचं विदारक चित्र या घटनेतून समोर आलं असून, अंत्यविधीसाठीही कुटुंबाला तास न् तास प्रतीक्षा करावी लागल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा