Nashik News: जिल्हा रुग्णालय, मालेगावातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसह जिल्हाभरातील ३२ सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार दिले जातात.

शहरातील उपनगरांसह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. झुंडीने फिरणाऱ्या कुत्र्यांनी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना गेल्या महिन्यात सिडको परिसरात घडल्या. मार्च ते मे या प्रजनन हंगामात श्वानदंशाच्या घटना वाढतात, त्यामुळे रुग्णांचा ओघही वाढतो.
Shivsena UBT: ठाकरे गटाबाबत कल्लोळ! नगरसेवकफुटीचे पक्षाकडून खंडन; सर्व 15 नगरसेवक सोबतचा दावा
श्वानदंशावर वेळीच आणि योग्य उपचार घेतले नाहीत, तर रेबीजसारखा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत १० हजार ४५५ जणांनी सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी सर्वाधिक ४३ हजार ३९ जणांनी उपचार घेतले होते. गेल्यावर्षी १२, तर या सहा महिन्यांत ३ जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
यंदा श्वानदंशात निम्मी घट
जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२५ या तीन वर्षांत जिल्ह्यात ९८ हजार ५७१ जणांनी श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. म्हणजेच सरासरी दररोज ९० जणांना श्वानदंशावर उपचार देण्यात आले. गेल्यावर्षी हे प्रमाण आणखी वाढले. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या संपूर्ण वर्षात दररोज सरासरी ११७ रुग्णांनी श्वानदंशावर उपचार घेतले होते. तर यंदा १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांत दररोज सरासरी ५८ जणांनी उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये धाव घेतली.
Suhas Kande On Bhujbal: भुजबळांच्या खात्यात घोटाळा! आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
श्वानदंश आणि रेबीजची लागण
वर्ष -रुग्ण -रेबीज रुग्ण -मृत्यू
२०२३-२४ —-२६,२५१ —-३ —-१
२०२४-२५ —-२९,२८१ —-४ —-४
२०२५-२६ —-४३,०३९ —-१४ —-१२
जानेवारी ते जून २०२६ —-१०,४५५ —-४ —-३

