Headlines

Stock market ends the week with a strong rally.


सेन्सेक्सची 827 अंकांसह उसळी, सर्वत्र तेजीची बहार, बँका, आयटीची चमक

 वृत्तसंस्था, मुंबई

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयटी कंपन्यांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तसेच बँकिंग समभागाच्या मजबुतीमुळे भारतीय शेअर बाजार जोरदार उसळी घेत बंद झाला. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा  सेन्सेक्स निर्देशांक 827 अंकांनी वाढत 77569 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 244 अंकांनी वाढत 24206 अंकांवर बंद झाला. या सोबत बँक निफ्टी निर्देशांक दमदार तेजी अनुभवत म्हणजेच 793 अंकांनी वाढत 58045 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक शुक्रवारी देखील तेजीत पहायला मिळाला. 539 अंकांनी वाढत आयटी निर्देशांक 28010 अंकांवर बंद होताना दिसला. आजच्या दिवसांमध्ये गुंतवणूकदारांच्या खिशामध्ये 6 कोटी रुपयांचा फायदा पडला.

यामध्ये सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग तेजी समवेत तर निफ्टीमधील 50 पैकी 40 समभाग तेजी सोबत बंद झाले आहेत. निफ्टी बँक निर्देशांकातील सर्व 14 बँकांचे समभाग मजबूत होत बंद झाले. मिडकॅप निर्देशांक 869 अंकांनी वाढत 63036 अंकांवर बंद झाला. रुपया 6 पैसे मजबूत होत 95.33 वर बंद झाला. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास फक्त एफएमसीजी निर्देशांक घसरणीत होता. ऑटो, कमोडीटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनाशियल, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. आयटीनंतर एनर्जी निर्देशांक सर्वाधिक 403 अंकांनी तर फायनाशिलयचा निर्देशांक 348 अंकांनी वाढताना दिसला.

शेअर बाजारात रिलायन्सचा समभाग 2.28 टक्के, बीईएलचा समभाग 2.17 टक्के, टेक महिंद्रा 2.06 टक्के इतक्या तेजीसोबत बंद झाले. अॅक्सीस बँक, टाटा स्टिल, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एल अॅण्ड टी हे समभाग जवळपास 1 टक्का इतके वाढत बंद झाले. अदानी पोर्ट, इन्फोसिस, इंडिगो, स्टेट बँक यांचेही समभाग चांगलेच वाढताना दिसले. घसरणीमध्ये पाहता ट्रेंट, अपोलो हॉस्पिटल, आयटीसी, डॉ. रे•ाrज लॅब्ज, कोल इंडिया, सनफार्मा, भारती एअरटेल, इटर्नल, अर्बन कंपनी, स्विगी, दीपक फर्टिलायझर, सीएट, टाटा कम्युनिकेशन, वरूण बेवरेजीस, लेन्स कार्ट यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत