Pune Moshi Building Collapse : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले. मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे १०० टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व प्रभावी व्यवस्था उभारण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

महत्त्वाचा मुद्दा उपस्थित
मोशी येथे कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर वाहत येऊन कोसळलेली इमारत अनधिकृत होती का, या ठिकाणी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी फक्त तळमजल्याला परवानगी देण्यात आली होती. मग, त्यावर दोन मजले बांधून अनधिकृत बांधकाम केले आहे का, असा गंभीर मुद्दा बांधकाम परवानगी विभागातील कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार उपस्थित झाला आहे. यामध्ये अभियंत्यांपासून ते अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सर्वच सामील होते का, त्यांनीच हे अनधिकृत बांधकाम करण्यास बळ दिले का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोशी कचरा डेपोमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी बांधकाम झाले आहे.
Bus hold for Shev Puri : इच्छा माझी ‘पुरी’ करा! बेस्ट चालकाने शेवपुरीसाठी बस रस्त्यात 20 मिनिटं थांबवली, मुलुंडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा
एक दिवसात बांधकाम पूर्णत्वाचा दाखला
विशेष म्हणजे या प्रशासकीय इमारतीला महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने २६ जुलै २०२३ रोजी सुधारित मंजुरी दिली आहे. अवघ्या २४ तासांत म्हणजेच दुसऱ्या दिवशी २७ जुलै २०२३ ला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. हा दाखलादेखील तळमजला पूर्ण एवढाच आहे.
सलग तिसऱ्या दिवशी बचावकार्य
मोशी कचरा डेपोमध्ये बुधवारी (८ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेले बचावकार्य शुक्रवारीही (१० जुलै) अखंड सुरूच होते. ६० तास उलटल्यानंतरही इमारतीत अडकलेल्या आठ जणांपर्यंत पोहचता आले नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली इमारतीभोवतीचा मलबा हटवून मागील बाजूने मार्ग तयार करण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. सध्या इमारतीचा अस्थिर झालेला भाग सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बाजूचा मलबा हटविण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि डंपरची मदत घेतली जात आहे. आत अडकलेल्या नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका पोहोचू नये, याची काळजी घेऊन अत्यंत सावधगिरीने बचावकार्य सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Maharashtra Weather : पाऊसधारा सरल्या, घामाच्या धारा परतल्या; मुंबई परिसरात तापमान 32 पार, पुढच्या आठवड्यात काय स्थिती?
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे आणि ‘एनडीआरएफ’चे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला. आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती घेतल्यानंतर अडकलेल्या नागरिकांपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचण्यासाठी पुढील रणनीती निश्चित करण्यात आली. प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती, इमारतीची सद्यस्थिती आणि संरचनात्मक धोके लक्षात घेऊन बचावकार्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
BEST Bus Accident: बेस्ट बसची ‘धडक’ मोहीम थांबेना! अंधेरीत 14 वाहनांना उडवले; दोन जण जखमी
दुर्घटनेला ६० तासांहून अधिक कालावधी
दुर्घटनेला ६० तासांहून अधिक कालावधी उलटला असला, तरी बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा आणि साधनसामग्री कार्यरत ठेवण्यात आली आहे. अडकलेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत शक्य तितक्या लवकर आणि सुरक्षितरीत्या पोहोचणे हेच सध्या प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. इमारतीच्या समोरील बाजूचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आता मागील बाजूने प्रवेशमार्ग तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यापूर्वी सुरक्षित बाहेर काढलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत अडकलेले नागरिक नेमक्या कोणत्या भागात असावेत, याचा अंदाज घेऊन त्याच दिशेने राडारोडा हटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती ‘एनडीआरएफ’चे प्रवीण धट्ट यांनी दिली.

