Abhishek Kumar slams Samarth Jurel:बिग बॉस सीझन १७ आणि ‘लाफ्टर शेफ्स’ चे स्पर्धक अभिनेता अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल या दोघांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल (यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये समर्थनं अभिषेकचा उल्लेख ‘माझा नोकर’ असा केला होता. समर्थच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता अभिषेक कुमारनं मौन सोडलं असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नक्की काय घडलं होतं?
तर काही दिवसांपूर्वी समर्थ जुरैलनं युट्युबवर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या ‘लाफ्टर शेफ्स’ मधील कुकिंग स्किल्सवर भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना समर्थ म्हणाला होता, “मी खूप छान स्वयंपाक करतो, पण तो (अभिषेक) सर्व काही बिघडून टाकतो… तो तर माझा नोकर आहे.” एवढंच नाही तर अभिषेक हा शोमधील इतर कलाकार जसं की कृष्णा अभिषेक आणि विकी जैन यांच्यासाठी ‘हेल्पर’ (मदतनीस) आणि ‘ड्रायव्हर’सारखं काम करतो, अशीही खिल्ली समर्थने उडवली होती.
अभिषेक कुमारचे सडेतोड उत्तर
समर्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिषेकनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहीत समर्थला खडेबोल सुनावले आहेत. अभिषेकनं लिहिलं की, “जेव्हा आपण कॅमेऱ्यासमोर किंवा शोमध्ये एकमेकांची खिल्ली उडवतो, तेव्हा त्यामागं केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा चांगला हेतू असतो. तो एक शोचा भाग असतो आणि आम्हीही ते समजून घेतो. पण दुसऱ्या कोणाच्या युट्युब चॅनलवर जाऊन माझ्याबद्दल अशा पद्धतीचे घाणेरडे शब्द वापरणे अत्यंत अपमानास्पद आहे. अशा गोष्टी फक्त शोमध्येच चांगल्या वाटतात, खऱ्या आयुष्यातील मुलाखतींमध्ये नाही.
Gargi Phule: ‘चार-पाच सिनेमे केले, पण त्यानं बाबांना एक रुपया देखील दिला नाही’, गार्गी फुलेंनी दाखवलं इंडस्ट्रीतलं वास्तव, मानधनाच्या मुद्द्यावर केलं भाष्य
“माझ्या कुटुंबाला मनस्ताप झाला…”
आपल्या भावना व्यक्त करताना अभिषेक पुढं म्हणाला की, मी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला, तेव्हा सुरुवातीला सार्वजनिकरी्या काहीही न बोलणं पसंत केलं. पण जेव्हा हे वक्तव्य माझ्या कुटुंबीयांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचलं, तेव्हा त्यांना याचा खूप मोठा धक्का बसला आणि त्यांचं मन दुखावलं गेलं आहे. कोणत्याही पालकांना आपल्या मुलाचा असा सार्वजनिक अपमान झालेला सहन होणार नाही.
मी नेहमीच समर्थला एक चांगला माणूस समजून त्याचा आदर केला, म्हणूनच त्याच्या या शब्दांमुळं मला जास्त त्रास झाला आहे.
Abhijeet khandkekar: ‘टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखं आहे’, मराठी मालिकासृष्टीचा स्टार अभिजीत खांडकेकरचं वक्तव्य चर्चेत
‘बिग बॉस’पासून सुरू असलेला वाद
अभिषेक कुमार आणि समर्थ जुरैल यांचा वाद नवीन नाही. ‘बिग बॉस १७‘ च्या घरातही या दोघांमध्ये प्रचंड भांडण झालं होतं, जिथं अभिषेकनं समर्थच्या कानाखालीही लगावली होती. शो संपल्यानंतर आणि ‘लाफ्टर शेफ्स’ मध्ये एकत्र काम करताना त्यांच्यात मैत्री झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, समर्थच्या या नव्या विधानामुळं या दोघांमधील मैत्रीत आता पुन्हा एकदा मोठी दरी निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावरही चाहते यावरून समर्थ जुरैलला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत असून अभिषेकला पाठिंबा देत आहेत.

