Headlines

Ram Shinde Rohit Pawar Alliance : कर्जतमध्ये भाजप उमेदवाराला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा – karjat nagarpanchayat election ncp sp and bjp alliance explained


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ramshinde #rohitpawar #karjatnagarpanchayatअहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीमध्ये घडलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि नाट्यमय घडामोडीने राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतलंय. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी, भाजपचे आमदार राम शिंदे हे स्थानिक पातळीवर एका मुद्द्यासाठी अप्रत्यक्षपणे एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत असताना आणि रोहित पवार सातत्याने भाजपवर सडकून टीका करत असताना, कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. हा केवळ स्थानिक पातळीवरील सत्तेचा खेळ आहे की यामागे आगामी काळातील काही मोठी राजकीय समीकरणे दडली आहेत? कर्जत मधील राम शिंदे आणि रोहित पवार एकत्र आल्याच्या चर्चा नेमक्या काय आहेत, कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीदरम्यान नेमकं काय घडलंय तेच या व्हिडिओतून समजून घेऊ.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत