Why Sensex and Nifty Rising Today 10 July 2026 Highlights: देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा कल पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराने 800 पेक्षा जास्त अंकांची उसळी घेतली तर, निफ्टी50 निर्देशांक 250 अंकांनी वाढून 24,200 वर व्यवहार करत असून आयटी, फायनान्शिअल, मेटल आणि फार्मा क्षेत्रांमध्ये चांगली खरेदी झाली.

शेअर बाजाराच्या तेजीमागे कोणाचा हात?
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, शुक्रवारी, देशांतर्गत बाजारात दिवसाच्या सुरुवातीपासूनच सकारात्मक व्यवहार होताना दिसत आहेत. बाजाराच्या तेजीत सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात खरेदी दिसून आली असून फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, मेटल, फार्मा स्टॉक्स 1 टक्क्यांहून जास्त वाढीसह व्यवहार करत आहेत. तसेच हिंडाल्को, अदानी एन्टरप्राइजेस आणि जिओ फायनान्स या कंपन्यांचे शेअर्सही 3-2% वधारले.
शेअर बाजाराच्या तेजीचे 3 कारण
- देशांतर्गत बाजाराच्या तेजीला तीन बड्या घटकांनी हातभार लावला. यापैकी पहिला म्हणजे, TCS मुळे आयटी स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली ज्यामुळे देशांतर्गत बाजारातील तेजीला चालना मिळाली. TCS ने अपेक्षेपेक्षा चांगली तिमाही कामगिरी बजावली असून कंपनीच्या व्यवस्थापनाने दुसऱ्या तिमाहीपासून मागणीत हळूहळू सुधारणेची शक्यात वर्तवलेली. त्यांनतर शुक्रवारी बाजारात 1.02% वाढीसह 2,070.40 रुपयांवर उसळले तर, निफ्टी आयटी निर्देशांकातही जवळपास 1.57% वाढ झाली.
- याशिवाय आशियाई बाजारातूनही देशांतर्गत बुल्सना आधार मिळाला. जागतिक बाजारपेठांमध्येही सकारात्मकता कायम राहिली असून आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 4 हून जास्त वाढला, तर हँग सेंग निर्देशांकात जवळपास 2% वाढ झाली ज्याचा परिणाम भारतीय बाजारातही जाणवला.
- त्याचवेळी, India VIX मध्येही घट नोंदवली गेली. बाजारातील भीती मोजणारा इंडिया VIX जवळपास 6% घसरून 12.63 वर आला. VIX मधील घसरण सामान्यतः बाजारासाठी सकारात्मक चिन्ह मानली जाते, जो गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास दर्शवतो.
तेलाच्या मागणीत घट होण्याची भीती
दुसरीकडे, जागतिक बाजारातून IEA कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत घट होण्याची आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने इशारा जारी केला आहे. IEA म्हणतात की, 2026 मध्ये जागतिक तेलाच्या मागणीत दररोज 10 लाख बॅरलने घसरणीचा अंदाज वर्तवला आहे, जी 2020 नंतर पहिली वार्षिक वार्षिक घट असेल.
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! बेसिक पगाराच्या हिशेबाने 60 टक्के भरगच्च पगार वाढणार, कमाल पगाराबाबत 3 मोठे प्रस्ताव
IEA ने म्हटले की, इराण युद्ध आणि त्याचा मध्य पूर्वेतील तेल उत्पादन आणि निर्यातीवर झालेला परिणाम या घसरणीचे सर्वात मोठे कारण आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापार ठप्प पडल्यामुळे पर्शियन आखातातून होणाऱ्या तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे ऊर्जा बाजारावरील दबाव वाढला. यावेळी तेलाच्या मागणीतील घट सर्व देश किंवा सर्व पेट्रोलियम उत्पादनांमध्ये एकसमान नसेल, तर त्याचा परिणाम काही विशिष्ट प्रदेशांमध्ये आणि उत्पादनांमध्ये अधिक दिसून येईल असे IEA ने म्हटले.

