Headlines

Narmada River Project: ‘अ’ आंदोलनाचा… – narmada water-sharing dispute pending for 20 yrs finally maharashtra to receive 10 tmc water


Narmada River Project: नर्मदा महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून केवळ ५४ किमी भागातून वाहते. हा भाग सातपुड्याचा; दुर्गम आणि डोंगराळ. तिथून पाणी उचलून राज्यात आणणे अशक्य होते.

narmada river
नर्मदा नदी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेला नर्मदा पाणी वाटपाचा वाद अखेर सुटला आणि महाराष्ट्राला १०अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. चर्चा आणि समन्वयाने कितीही मोठे तिढे सुटू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत नर्मदा प्रकल्पाशी संबंधित महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमतीने वादावर पडदा पडला.

महाराष्ट्राच्या हक्काचे १० टीएमसी पाणी दोन स्रोतांतून मिळणार आहे, यापैकी पाच टीएमसी पाणी प्रस्तावित नर्मदा-तापी वळण योजनेतून तर उर्वरित पाच टक्के गुजरातमधील उकाई धरण ामधून थेट उचलले जाणार आहे, मात्र यासाठी उकाई धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असायला हवे, अशी अट आहे. खरे तर नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन अन्य राज्यांनी पाण्याचा वापर सुरूही केला; पण महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र थेंबभर पाणीही आले नव्हते. आता या १० टीएमसी पाण्याचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील दुर्गम आणि दुष्काळी भागाला होऊन पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. ‘उकाई’मधून पाणी कसे उचलायचे याचा कृती आराखडा आता तयार होईल. महाराष्ट्राच्या वाट्याला टिपूसभर पाणी नाही आणि थकबाकी मात्र मोठी, अशी स्थिती होती.

सरदार सरोवर प्रकल्पामुळे अनेक आदिवासी गावे बुडाली. या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा खर्च आणि प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च यावरून मोठी थकबाकी अडकली होती. मध्य प्रदेश आणि गुजरात महाराष्ट्राकडून पैशांची मागणी करत होते, तर हक्काच्या पाण्याचा तिढा सुटल्याशिवाय महाराष्ट्र पैसे देण्यास तयार नव्हते. मंगळवारच्या बैठकीत बहुतांशी थकबाकी माफ करण्यात आल्याने आता केवळ २७ कोटी रुपये देणे बाकी आहे.

पाणी गुजरातमधून आणण्याशिवाय पर्याय नव्हता. महाराष्ट्राने हे पाणी तापी खोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा एका नदी खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी वळवता येत नसल्याच्या नियमावर बोट ठेवून गुजरात आणि मध्य प्रदेशने त्याला मोडता घातला होता. आता तिढा सुटला आहे. इतकी वर्षे गुजरातने महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी दडपून वापरले; दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ते महाराष्ट्राच्या अंगणात आले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा